शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोर-पोलिसांच्या पाठशिवणीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:44 IST

पंचवटी : वार बुधवार (दि.९).. वेळ मध्यरात्री १ वाजेची.. रस्त्यावरचे बहुतांशी पथदीप बंदच... स्थळ हिरावाडी परिसरातील शक्तीनगऱ तीन ते चार भुरटे चोर एका दुकानाचे शटर लोखंडी वस्तूने तोडत असल्याचा आवाज येतो अन् काही मिनिटातच पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात़

पंचवटी : वार बुधवार (दि.९).. वेळ मध्यरात्री १ वाजेची.. रस्त्यावरचे बहुतांशी पथदीप बंदच... स्थळ हिरावाडी परिसरातील शक्तीनगऱ तीन ते चार भुरटे चोर एका दुकानाचे शटर लोखंडी वस्तूने तोडत असल्याचा आवाज येतो अन् काही मिनिटातच पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात़ यानंतर रंगतो चोर-पोलिसांचा पाठशिवणीचा खेऴ पोलीस आल्याची चाहूल लागताच चोर पुढे व पोलीस मागे असा एखाद्या सिनेमाला शोभावा, असा प्रसंग रंगतो. अखेर या खेळात भुरट्या चोरांना अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याची नामी संधी मिळते़पोलिसांनी चारही दिशेला पोलीस कर्मचारी पाठवून भुरट्या चोरट्यांचा सुगावा लावण्याचा प्रयत्न केला़ मात्र भुरटे चोर इमारतीच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी ठरले़ एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच काहीशी घटना बुधवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमाराला हिरावाडीतील शक्तीनगर परिसरात घडली़ या परिसरात एकदंत अपार्टमेंट असून त्यात इच्छामणी नावाचे गॅरेज आहे़ मध्यरात्री रस्त्यावरील सर्वच पथदीप बंद असल्याने भुरट्या चोरट्यांनी त्याचा फायदा घेत त्या गॅरेजचे कुलूप तोडले़ तर दुकानाजवळ दोन-तीन संशयित काहीतरी तोडत असल्याचा आवाज शेजारच्या इमारतीतील नागरिकांना आला़ त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली़ त्यानंतर हवालदार सुरेश नरवडे, महेश साळुंखे, विलास चारोस्कर, विष्णू जाधव असे परिसरात गस्त घालत होते. चोर आल्याची माहिती मिळताच काही मिनिटांतच ते घटनास्थळी पोहोचले.पोलीस आल्याची कुणकुण लागताच एका संशयिताने त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला़ मात्र त्याने अंगात असलेले जॅकेट व टोपी फेकली. अर्धा किलोमीटरपर्यंत चोर पुढे आणि पोलीस मागे असा पाठलाग सुरू होता. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोर पसार झाला. त्यानंतर काही वेळात त्या दुकानाचे शटर तोडून आत लपलेल्या अन्य दोघांनी बाहेर कोणी नसल्याचे बघून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी हातात बॅटरी काठ्या घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र अंधार तसेच लगतच्या इमारती यामुळे चोरट्यांना लपायला जागा मिळाली व चोरटे पसार झाले.

टॅग्स :Policeपोलिस