शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘डेटिंग ॲप’द्वारे मैत्री करत युवतींवर अत्याचार करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:27 IST

‌इंदिरानगर परिसरातून दोन महिन्यांपूर्वी एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस ठाण्यात ...

‌इंदिरानगर परिसरातून दोन महिन्यांपूर्वी एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात होता. युवतीचा शेअर चॅट ॲप्लिकेशनद्वारे‌ एका व्यक्तीशी संपर्क झाल्याचे तपासात पुढे आले. संशयित वैभव लक्ष्मण पाटील (रा.मुरळी, ता.पाटण, जि.सातारा) याच्यासोबत घरातून डिसेंबर महिन्यात गेल्याची माहिती समजली. सातत्याने पाटील याच्या मागावर इंदिरानगरमधील पोलिसांचे पथक होते; मात्र कोठूनही त्याचा सुगावा लागू शकत नव्हता. मुरबाड, ठाणे, सातारा, महाड या शहरांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. मुरबाडमधील एका खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे पथकाने तेथे सापळा रचला. उपनिरीक्षक प्रवीण बाकले, सुहासिनी बारेला, जावेद खान आदींनी संशयित पाटील यास शिताफीने अटक केली. तसेच त्याच्या तावडीतून बेपत्ता मुलीची सुखरूप सुटकाही केली. त्याच्याविरुध्द यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील रबाडा पोलीस ठाण्यासह साताऱ्यात बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पाटीलविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.२०) पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास बारेला या करीत आहेत.

-----इन्फो----

...असा केला विश्वास संपादन

पीडित मुलीशी चॅटिंग करत तिचा मोबाइल क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री करत नंतर प्रेमसंबंध असल्याचे सांगून आपण कोर्टात जाऊन लग्न करू. युवतीला पाथर्डीफाटा येथून झायलो कारमध्ये (एमएच१४ सीएक्स २५९५) या वाहनात बवसून तिचा मोबाइल ताब्यात घेत तो बंद करत बळजबरीने थेट मुरबाडला घेऊन गेला. विवाहाच्या नावाखाली त्याने पीडितेकडील दीड तोळ्याचे दागिने काढून घेत बनावट नोटरी केल्याची कागदपत्रे दाखवून फसवणूक, तर तिच्या इच्छेविरुध्द सलग काही दिवस शारीरिक संबंध प्रस्थापित करत लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात पुढे आले आहे.

---

फोटो आर वर १७इंदिरानगर नावाने सेव्ह