शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

युती-आघाडीवर इच्छुकांचे भवितव्य

By admin | Updated: October 12, 2016 23:48 IST

संभ्रमावस्था : सत्ताधारी मनसेच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना व आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी आगामी काळात युती-आघाडीवरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. युती-आघाडी झाल्यास अनेकांचा पत्ता कापला जाण्याची भीती असल्याने बदलणाऱ्या समीकरणांबाबत संभ्रमावस्था असून, सत्ताधारी मनसेच्या भूमिकेकडेही राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागून आहे.महापालिका निवडणुकीसाठी यंदा चार सदस्यीय प्रभागरचना तयार करण्यात आल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेना व भाजपा यांनी युती न करता स्वतंत्रपणे लढा दिला होता. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली होती. राज ठाकरे यांच्या मनसेनेही स्वतंत्रपणे लढत सर्व जागांवर उमेदवार दिले होते. त्यात मनसेचे ४०, शिवसेना व रिपाइंचे २२, राष्ट्रवादीचे २०, कॉँग्रेसचे १५, भाजपाचे १४, जनराज्यचे २, माकपाचे ३ तर अपक्ष ६ उमेदवार निवडून आले होते. सेना-भाजपा युती तुटल्याने त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला होता. भाजपाने कोणत्याही परिस्थितीत युती न करण्याचा आणि संघटनशक्ती वाढविण्याचा आग्रह कायम ठेवला आणि स्बबळावर नशीब आजमावत आपल्या १४ जागा राखल्या होत्या. आता फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत सेना-भाजपात युती होते किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था असून, वेगवेगळ्या पातळीवर चर्चा केली जात आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र आघाडीचे संकेत मिळत आहेत. महापालिका निवडणुकीत सेना-भाजपा युती तसेच कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाल्यास इच्छुक अनेक परंतु जागा कमी, अशी स्थिती समोर येणार आहे. त्यामुळे ऐनवेळी पत्ता कापला जाण्याचा धसका इच्छुकांनी घेतला आहे. त्यात काही विद्यमान नगरसेवकांचाही पत्ता कापला जाण्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली असल्याने त्यांच्याही पोटात गोळा उठला आहे. युती अथवा आघाडी झाल्यास उमेदवारी वाटपाबाबत राजकीय पक्षांची कसोटी लागणार आहे. मात्र, सध्या सेना-भाजपातील तणावपूर्ण संबंध पाहता आणि स्थानिक पातळीवरही भाजपा पदाधिकाऱ्यांची सेनेविरुद्ध आक्रमक भूमिका पाहता युती न होण्याचीच चर्चा होत आहे. दरम्यान, सत्ताधारी मनसेची दोलायमान स्थिती असून, मनसे कुणाबरोबर युती करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मनसे-भाजपा तसेच सेना-मनसे एकत्र येण्याच्याही चर्चा ऐकायला मिळत आहेत. मनसेबरोबर भाजपाच्या युतीची चर्चा जोर धरून आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)