शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतींचे भवितव्य महासभेच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:20 IST

महापालिकेच्या मिळकती बाजारमूल्याच्या अडीच पट दराने देतानाच कालावधी ठरविण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने महासभेवर पाठविला असून, आता महासभेत या प्रस्तावाचे भवितव्य ठरणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती : घंटागाडी ठेक्याची होणार चौकशी

नाशिक : महापालिकेच्या मिळकती बाजारमूल्याच्या अडीच पट दराने देतानाच कालावधी ठरविण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने महासभेवर पाठविला असून, आता महासभेत या प्रस्तावाचे भवितव्य ठरणार आहे.स्थायी समितीची बैठक गुरुवारी (दि.२२) सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मनपाच्या मिळकती अनेक राजकीय नेत्यांना नाममात्र दराने देण्यात आले आहेत. एकूण नऊशे मिळकती मनपाच्या मालकीच्या असून, त्याला भाडे ठरविण्याचे कायद्याने अधिकार आयुक्तांना आहेत, मात्र त्यांना बारा महिने कालावधीसाठीच मिळकत भाड्याने देता येते त्यापेक्षा अधिक कालावधीसाठीचे अधिकार स्थायी समितीला असून, ते आयुक्तांना हस्तांतरित करण्याचा विषय होता.दरम्यान, स्थायी समितीने गेल्या बैठकीत घंटागाडीच्या ठेक्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्याचे ठरवले होते, परंतु त्याचा उल्लेख गुरुवारी सादर करण्यात आलेल्या इतिवृत्तात नसल्याने मुशिर सय्यद आणि अन्य सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले अखेरीस सभापतींनी त्यानुसार कार्यवाही करण्याचे ठरवले. याशिवाय अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या चौकशी अहवालास होत असलेल्या दिरंगाईवर चर्चा झाली.तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने त्याचे एकूणच परिणाम स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. मुंढे यांची बदली झाल्याने आता मुक्तपणे काम करा, असे दिनकर पाटील यांनी अधिकाऱ्यांना टोले लगावले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEconomyअर्थव्यवस्था