शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:49 IST

नांदगाव : रेड झोनमध्ये असलेल्या नांदगाव शहरात दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्याने रस्ते दुतर्फा गर्दीने फुलले. सामाजिक अंतर पाळण्याचे बंधन गळून पडले. कोरोनाची भीती अंतर्धान पावली. फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला. कर्णकटु हॉर्नचे कानठळ्या बसविणारे आवाज व भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकी वाहनांनी कोरोना धाब्यावर बसवला. कालपर्यंत दुकाने उघडावीत की नाही याविषयी मनात धाकधूक होती. पण परवानगी असल्याचे नक्की कळाल्याने आज सर्वांनी दुकाने उघडली.

नांदगाव : रेड झोनमध्ये असलेल्या नांदगाव शहरात दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्याने रस्ते दुतर्फा गर्दीने फुलले. सामाजिक अंतर पाळण्याचे बंधन गळून पडले. कोरोनाची भीती अंतर्धान पावली. फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला. कर्णकटु हॉर्नचे कानठळ्या बसविणारे आवाज व भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकी वाहनांनी कोरोना धाब्यावर बसवला. कालपर्यंत दुकाने उघडावीत की नाही याविषयी मनात धाकधूक होती. पण परवानगी असल्याचे नक्की कळाल्याने आज सर्वांनी दुकाने उघडली.तोंडावरचे मास्क गळून पडले. दाटीवाटीने चालणारे पादचारी व हॉर्नच्या आवाजात, कोरोनाविषयी जागे करणारे नगर परिषदेचे ध्वनिक्षेपक शांत झाले.. गेला कोरोना.. कोरोना गेला. घरात बसून कंटाळा आला होता हो.. आज जरा पाय मोकळे करूनच येतो असे संभाषण करत नागरिक रस्त्यावरआले.महिनाभर पोलिसांच्या धाकाने सुनसान झालेले रस्ते गजबजले. यापुढे कोरोनाला घाबरायचे कारण नाही, अशी समजूत जणू नागरिकांनी करून घेतली की काय, असे वाटावे. इतपत भाऊगर्दी रस्त्यांवर जमा झाली. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून घालण्यात आलेले नियम व बंधनांचा मागमूस आज उरला नव्हता.गेल्या काळात दुकानदार व विविध व्यावसायिक यांचे आर्थिक चलनवलन बंद पडले होते. त्यामुळे लॉकडाउन कधी संपतो व आपली उपजीविकेची साधने केव्हा सुरू होतात. हातातला पैसा संपला आहे. चलन फिरले नाही तर पुढे काय? या विचारांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. त्याचा परिपाक आज मोठ्या संख्येने वाहने व पादचारी रस्त्यावर येण्यात झाला. अनेक व्यावसायिकांनी थोडी फार तरी विक्र ी झाली. हातात पैसा आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक