शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नाशिकमध्ये फर्निचर व्यावसायिकाचे अपहरण करून खून; कालव्यात फेकला मृतदेह

By अझहर शेख | Updated: September 11, 2022 19:13 IST

अपहरणकर्त्यांनी खून करून मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात फेकून दिला.

नाशिकरोड: येथील एकलहरारोड वरील लाकडी फर्निचर बनविणाऱ्या स्वस्तिक कारखान्याचे संचालक व्यावसायिक शिरीष गुलाबराव सोनवणे यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून करून मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यांच्या खूनामागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी या घटनेने नाशिक शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोनवणे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान नाशिकरोड पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल शेजारी असलेल्या किंग्स कोर्ट अपार्टमेंटमध्ये राहणारे शिरिष गुलाबराव सोनवणे (५६) यांचे एकलहरा रोडवर स्वस्तीक फर्निचर नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात शालेय लाकडी बाक तयार केले जातात. अनंत चतुर्दशीला शुक्रवारी (दि.९) दुपारी साडे चार ावाजेच्या सुमारास सोनवणे कारखान्यात आले होते. यानंतर एका स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्ती कारखान्यासमोर आले. त्यांनी कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला सोनवणे यांना आँर्डर द्यायची आहे, असे सांगून गाडी जवळ पाठविण्यास सांगितले. मात्र, फिरोज याने त्यांना ‘आपणच कारखान्यात चला..,’ असे सांगितले असता गाडीतील व्यक्ती दिव्यांग असल्याचा संशयितांनी बनाव केला. त्यामुळे फिरोज याने मालक सोनवणे यांना कारखान्यात जाऊन तसा निरोप दिला. यानंतर सोनवणे हे बाहेर आले व गाडीत बसले. सोनवणे हे कुठेच मिळून येत नसल्याने अखेरीस सायंकाळी उशिरा नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.या घटनेने संपुर्ण सोनवणे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून कुटुंबियांसह कारखान्यातील कामगारांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी, मुलगा, सून असा परिवार आहे.

सीसीटीव्हींची पाहणी; कामगारांकडे चौकशीबेपत्ता नोंदीचा तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकांकडून केला जात होता. घोटी, शिंदे टोल नाका येथील सीसीटीव्ही फुटेज व फोन काॅल्सच्या आधारे तपासाला गती दिली जात होती; मात्र शनिवारी सकाळी मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव तालुका पोलिसांना सापडला. मृतदेहावर विविध जखमाही असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वस्तिक कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे हे अगोदरपासूनच बंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कारखान्यामध्ये बारा कामगार कामाला असून त्यांची प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली आहे. मात्र कुठलाही सुगावा हाती लागू शकलेला नाही. सोनवणे यांचा मुलगा व सून हे अमेरिकेत वास्तव्यास असून ते सोमवारी पहाटेपर्यंत नाशिकमध्ये पोहचणार आहेत. त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

टॅग्स :Nashikनाशिक