शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जवान विजय सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:00 IST

डांगसौंदाणेवर शोककळा : ‘अमर रहे’च्या घोषणा देत अखेरचा निरोप

ठळक मुद्देविजय सोनवणे (वय ३३) यांचा आसामच्या तेजपूर भागात सोमवारी (दि.१७)कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.

डांगसौदाणे : ‘अमर रहे,अमर रहे विर जवान विजय सोनवणे अमर रहे....’.‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’...अशा घोषणा देत डांगसौंदाणे येथील नागरिकांनी भुमिपूत्र लष्करी जवान विजय सोनवणे यांना भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला. विजय सोनवणे (वय ३३) यांचा आसामच्या तेजपूर भागात सोमवारी (दि.१७)कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.मंगळवारी (दि.१८) रात्री उशिरा विजयचे पार्थिव डांगसौंदाणे येथे आणण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी गावातील आठवडे बाजार, व्यापारी पेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत विजय सोनवणे यांच्या अंतिम संस्कारासाठी बाजार आवारतील मुख्य पटांगणात फुलांनी सजविलेला चबुतरा बांधून तयारी ठेवली होती. अंत्यसंस्कारापूर्वी विजय यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विजय यांची पत्नी खुशाली, आई-वडील, त्यांची अवघी ४ वर्षाची मुलगी अनुष्का आणि १३ महिन्यांचा मुलगा वृषभ या सर्वांचा आक्र ोश उपस्थितांची मने हेलावणारा होता. फुलांनी सजविलेल्या रथातून विजय यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी अंतिम दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती तर प्रत्येक घरासमोर विजय यांना रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली होती. अंत्यसंस्कारप्रसंगी सटाणा बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे, श्री.स्वामी समर्थ विद्याप्रसारकचे अध्यक्ष सुरेश वाघ,कैलास बोरसे,मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे, जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष सोपान सोनवणे, उपसरपंच विजय सोनवणे,डॉ. सुधीर सोनवणे, पंकज बधाण,अंबादास सोनवणे,पंढरीनाथ सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने प्रभारी पोलिस अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, आसाम तेजपुरहून आलेले नायक सुभेदार गोरख कोरडे, नायक सुभेदार उत्तम सेंडगे,नायक कृष्णा सोनवणे, दादा जाधव, संपत चव्हाण, प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसिलदार प्रमोद हिले, ग्रामपंचायत सरपंच जिजाबाई पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.

टॅग्स :Nashikनाशिक