शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

शहीद गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:33 IST

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झाले.

सिन्नर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झाले. सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथे सोमवारी सायंकाळी शहीद केशव गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार  करण्यात आले. यावेळी अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या  हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी येथील गरीब कुटुंबातील केशव सोमगीर गोसावी हे सुमारे नऊ वर्षापूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. कोल्हापूर, गया व काश्मिर येथे सेवा बजावल्यानंतर सध्या ते जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये कार्यरत होते. मराठा लाइट इन्फन्ट्रीची तुकडी सीमेवर गस्त घालत असतांना शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाकच्या बाजूने स्नायपरचा हल्ला झाला. या हल्ल्यात केशव जखमी झाले होते. उपचारादरम्यान ते शहीद झाले.केशव यांना वीरमरण आल्याची वार्ता सिन्नर तालुक्यात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आली. या दु:खद बातमीमुळे सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली. शिंदेवाडी ग्रामस्थांनी सकाळपासून स्वयंस्फूर्तीने बंद पाळून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.विशेष शासकीय विमानाने केशव यांचे पार्थिव ओझर विमानतळावर सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास आणण्यात आले. ओझर विमानतळावर लष्करी अधिकारी, महसूल व विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी आदरांजली अर्पण केली. ओझर विमानतळावरुन लष्करी वाहनाद्वारे शहीद केशव यांचे पार्थिव सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी येथे आणण्यात आले. केशव यांचे पार्थिव घरी येताच कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.सजविलेल्या रथातून केशव यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, केशव गोसावी अमर रहे ! या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिलांनी अंत्ययात्रेच्या मार्गावर सडासंमार्जन करुन रांगोळ्या काढल्या होत्या. स्मशानभूमी परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. हजारो नागरिक शोकसागरात बुडाल्याचे दिसून येत होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शहीद केशव यांचा दफनविधी करण्यात आला. लष्कर व पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली.अंत्यसंस्कार प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, प्रांत महेश पाटील, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, राहुल आहेर, जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, सहाय्यक निरीक्षक मोतीलाल वसावे, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी शहीद जवान केशव यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. दिवसभर केशवची प्रतीक्षारविवारी रात्री केशव गोसावी यांना वीरमरण आल्याची वार्ता शिंदेवाडी येथे पोहचली होती. गोसावी कुटूंबीय, नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांच्या नजरा केशव यांचे पार्थिव शिंदेवाडी गावात येण्याकडे लागून राहिल्या होत्या. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून हल्ल्याचा निषेध केला होता. दिवसभर अंत्यविधी परिसरात साफसफाई मोहीम राबविण्यात आली व अंत्यविधीला येणाºया हजारो नागरिकांना बसण्याची व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. 

टॅग्स :SoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानNashikनाशिक