शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या घरासमोरच केले विवाहितेवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:26 IST

इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे येथे नवविवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी या विवाहितेचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या घरासमोर केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू सासºयासह पाच लोकांविरुद्ध वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती व सासूला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे येथे नवविवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी या विवाहितेचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या घरासमोर केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू सासºयासह पाच लोकांविरुद्ध वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती व सासूला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील पिंपळद येथील शेतकरी धोंडीराम लक्ष्मण घोलप यांची पुतनी नंदिनी (२३) हिचा विवाह वाडीवºहे येथे सागर मधुकर मालुंजकर यांच्याबरोबर ३० एप्रिल २०१६ रोजी झाला होता. विवाहच्या चार महिन्यानंतर या नवविवाहितेला घरगुती किरकोळ कारणावरून कुरापत काढून तिचा नवरा सागर मधुकर मालूजकर, सासरा मधुकर राजाराम मालूंजकर, सासू शांताबाई मधुकर मालूंजकर, चुलत सासरा अनिल राजाराम मालूंजकर, चुलत सासू मिनाबाई अनिल मालुंजकर हे सर्व छळ करत होते. या नवविवाहितेने रविवारी दुपारी २.३० ला वाडीवºहे येथे तिच्या सासरी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिला उपचार्थ नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले काल सायंकाळी सात वाजता तीची प्राणज्योत मालवली. असे रु ग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यानंतर सोमवारी संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी वाडीवºहे पोलीस स्टेशन गाठून जोपर्यंत संशियत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्य संस्कार होणार नाही अशी भूमिका घेत गोंधळ घातला. दरम्यान संशियतांना ताब्यात घेतल्यानंतर मयत नंदिनीच्या माहेरच्यांनी तिचे प्रेत तिच्या सासरच्या घरासमोर आणून तिथंच तिचा अंत्यसंस्कार केला. दरम्यान मयत नंदिनीचे चुलते धोंडीराम घोलप यांनी दिलेल्या फिर्यादिवरु न वाडीवºहे पोलिसांनी मयत महीलेचा नवरा, सासु सासरा, चुलत सासु सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे ,पोलिस निरीक्षक एस डी देशमुख, उपनिरीक्षक आठवले यांनी संतप्त जमावाला शांत करीत, समजूत काढून संशियताविरोधात कठोर शासन करण्यात येईल अशी ग्वाही दिली.पैशांसाठी तगादानंदिनीस दिवस गेल्यानंतर बाळंतपणासाठी झालेल्या दवाखान्याचा खर्च म्हणून ४० हजार रु पयांची मागणी तिच्या सासरच्या नातेवाइकांनी करून तो खर्चही भरून घेतला होता. तरीही तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतीच्या मशागतीसाठी व बी- बियाणांसाठी एक लाख रुपये खर्च माहेरून घेऊन ये, असा तगादा लावला होता. हे पैसे आणू न शकल्याने नंदिनीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.