शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांचा निधी मार्चअखेर खर्च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:24 IST

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा चार वर्षांपासून चार कोटींचा निधी अखर्चित असून, येत्या मार्च २०१८ अखेर हा निधी शंभर टक्ेक खर्च करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिली.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा चार वर्षांपासून चार कोटींचा निधी अखर्चित असून, येत्या मार्च २०१८ अखेर हा निधी शंभर टक्ेक खर्च करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिली. सुमारे चार कोटींचा तीन टक्के अपंग निधी गेल्या चार वर्षांपासून खर्च होत नाही. त्यातच येत्या बुधवारी (दि.२७) प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची भेट घेऊन त्यांना अपंगांच्या योजना व त्यांच्याबाबतीच्या निधीबाबत विचारणा करणार आहे.  महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांना अपंगाचा निधी खर्च होत नसल्यावरून आमदार बच्चू कडू यांनी जाब विचारल्याची घटना ताजी आहे. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी अपंग निधी नियोजनाबाबत व खर्चाबाबत आढावा घेतला. तसेच सर्व गटविकास अधिकाºयांना पत्र पाठवून अपंगांसाठी वैयक्तिक व सामूहिक स्वरूपातील असलेल्या योजनांबाबत तत्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहे.या चार कोटींतील ७५ टक्के निधी हा सामूहिक स्वरूपावर, तर २५ टक्केनिधी हा वैयक्तिक बाबींवर खर्च करावयाचा आहे. या चार कोटींतील ८० लाखांचा निधी हा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारत व नवीन प्रशासकीय इमारत या दोन्ही ठिकाणी लिफ्ट बसविण्यात येणार आहे. जेणे करून अपंग व ज्येष्ठ नागरिकांना या लिफ्टच्या सहाय्याने दोन व तीन मजले पार करून विभागात जाता येणार आहे.वैयक्तिक लाभाचे १५०० प्रस्ताव प्राप्तआतापर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी हजार ते पंधराशे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र चार ते सहा हजार प्रस्ताव आल्यावर त्यांची छाननी करून त्यातील निवडक अपंग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे दीपककुमार मीणा यांनी सांगितले. येत्या मार्च २०१८ पर्यंत हा सर्व निधी खर्च करण्याबाबतचे नियोजन करण्यात आल्याचेही दीपककुमार मीणा यांचे म्हणणे आहे.