शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील विकास कामांसाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 18:28 IST

मालेगाव महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील भागात मुलभूत सोयसुविधांच्या कामांसाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या फेब्रुवारी अखेर विकास कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालेगाव : महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील भागात मुलभूत सोयसुविधांच्या कामांसाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या फेब्रुवारी अखेर विकास कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील महापालिकांना मुलभूत सोयसुविधांच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ५ कोटी रूपयांच्या निधीला ८ जानेवारी २०१९ रोजी नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. या निधीतून गिरणा नदीवरील पूल, रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरण, कॉलनी अंतर्गत रस्ते, कलेक्टरपट्टा भागातील भूमिगत गटारी, स्मशानभूमी दुरुस्ती आदिंसह इतर कामे केली जाणार आहेत तर हद्दवाढ भागातील सोयसुविधांसाठी राज्य शासनाने १४.५५ कोटींच्या प्रस्तावाला यापूर्वी मंजुरी दिली आहे. त्याचा पहिला हप्ता ५.८२ कोटी वितरीत करण्यात आला आहे. या निधीतून शिल्लक राहिलेल्या ३ कोटीच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून हद्दवाढ भागातील कलेक्टरपट्टा भागात गटार बांधकाम, सोयगाव - जयरामनगर ते दौलती शाळापर्यंत शिवरोड रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण, रमजानपुरा भागात सभा मंडप, सायने बु।।ला शौचालय, जॉगिंग ट्रॅक, बैठक व्यवस्था, तलाव सुशोभिकरण, सोयगाव व भायगाव येथे सामाजिक सभागृह, म्हाळदे येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण, सोयगाव भागातील रस्ते आदिंसह इतर कामे केली जाणार आहे.फेब्रुवारी अखेरपर्यंत या कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, नगरसेवक निलेश आहेर, राजाराम जाधव, महानगर प्रमुख रामा मिस्तरी, भरत देवरे, मनोहर बच्छाव आदि उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवMONEYपैसाministerमंत्री