शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

शासनाच्या धोरणानुसारच कामकाज

By admin | Updated: January 12, 2017 00:15 IST

कुलगुरूंचे स्पष्टीकरण : निर्णय मागेच; अंमलबजावणी आता

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठात शासनाच्या मार्गदर्शक धोरणानुसारच कामकाज होत असून, धोरणात्मक निर्णय हे तत्कालीन कुलगुरूंच्या काळात झाले असून, त्याची अंमलबजावणी आता होत आहे. बदल्यांमध्ये कोणताही दुजाभाव करण्यात आलेला नाही तर अधिकाऱ्यांनी कॅमेरा बसविण्याचे लेखीच दिल्याने त्यांच्यावर सक्ती करण्यात आली नसल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले. विशेषत: कुलगुरूंच्या गाडी खरेदीचा निर्णय तत्कालीन कुलगुरूंच्या काळात झाल्याचेही म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. ‘आरोग्याची मनमानी या मालिकेत ‘लोकमत’ने अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला असता कुलगुरूंनी यावर आपली भूमिका मांडली आहे. शासनाच्या मार्गदर्शक धोरणानुसार अधिकाऱ्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. अधिकारी फोरमने कॅमेरे बसविण्याबाबत लेखी संमती दिल्याचेदेखील त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर बोलण्याबाबतही विद्यापीठाचा कोणताच आक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रभारी पदांबाबत विद्यापीठाने वेळोवेळी जाहिरात प्रक्रिया केलेली आहे. भरतीच्या जाहिरातीबाबतचा विषय व्यवस्थापन परिषदेवर ठेवण्यात आला होता, असेही कुलगुरूंचे म्हणणे आहे.  परीक्षा विभागातील कारभार सहायक कुलसचिव दर्जाचे अधिकारी पाहात नसून विद्यापीठासाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांच्या भरतीची कार्यवाही शासनाकडून सेवाप्रवेश नियमात सुधारणा झाल्यानंतर आणि शासनाने नव्याने विहित केलेल्या बिंदूनामावलीनुसार होणार आहे. वाहन खरेदीची कार्यवाही यापूर्वीच झालेली आहे. त्याची अंमलबजावणी मात्र आता करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या मागील बाजूस पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय मागील वर्षीचा असल्याचेदेखील कुलगुरूंनी म्हटले आहे. एमबीए अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना त्यांच्यावरील तक्रारींमुळे मुदतवाढ देण्यात आलेली नव्हती, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)दुजाभाव नसल्याचा खुलासाविद्यापीठातील संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. विद्यापीठातील अंतर्गत बदल्या प्रशासकीय कामाकाजाचा भाग असून, त्यात दुजाभाव नसल्याचा खुलासा विद्यापीठाने केलेला आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय विद्यापीठाचा असून, यूजीसीने याबाबत कोणत्याही सूचना केलेल्या नसल्याचे म्हटले आहे.