नाशिक: फुलेनगर तेलंगवस्तीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपआयुक्तांच्या विशेष पथकाने छापा मारून बारा संशयित जुगाºयांवर कारवाई केली आहे. पोलीसांनी संशयितांकडून २५ हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहीती अशी की, फुलेनगर येथिल तेलंगवस्तीत काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. काल सोमवार (दि. २१) दुपारी साडेचार वाजता पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या विशेष पथकाने परिसरात छापा मारला असता एका खोलीत तब्बल १० ते १५ संशयित पत्तयांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी पुरूषोत्तम वारू, गोपाल कापकर, मुस्ताक शेख, सुर्यकांत किरवे, गोपाल आहुजा, सचिन खिच्ची, काळू लहामगे, आदिंसह अन्य संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जुगार प्रतिबंध कलम अन्वये कारवाई केली आहे तर तीन ते चार संशयित पसार असल्याचे पंचवटी पोलीसांनी सांगितले.हिरावाडीतील पाटालगत असलेल्या एका समाजमंदीरात सोमवारी जुगार खेळणाºयांवर पोलीसांनी छापा मारून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ हजाराची रोकड जप्त केली आहे. पंचवटी पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
फुलेनगर तेलंगवस्तीतील जुगार अड्डयावर छापा, रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 18:31 IST