शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फरार संशयित सागर जाधवला अटक

By admin | Updated: July 14, 2017 17:58 IST

जळगाव जिल्ह्यातून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : पेठरोडवरील नवनाथनगर परिसरात राहणाऱ्या किरण निकम (३०) या युवकाच्या खून प्रकरणात मागील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित सागर जाधवला पंचवटी पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव शिवडी येथून अटक केली आहे. निकम खून प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.निकम खून प्रकरणात पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयित संतोष उघडे याला दोन दिवसांपूर्वीच पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले होते, त्यानंतर शुक्र वारी ( दि. १४) रात्री जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मे महिन्यात किरण निकम याची पूर्ववैमनस्यातून संशयित आरोपी संतोष उघडे, सागर जाधव, गणेश उघडे, बंडू मुर्तडक व संतोष पगारे यांनी नवनाथनगरला भरवस्तीत धारदार शस्त्राने खून केला होता. या घटनेनंतर पाचही संशयित आरोपी फरार झाले होते.या घटनेनंतर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती, तर संतोष उघडे व सागर जाधव हे दोन संशयित फरार झाले होते. काही दिवसांपासून पोलीस जाधव व उघडेच्या शोधात होते. त्यातच काही दिवसांपूर्वी उघडेच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर झळकले होते. फरार संशयित आरोपी उघडे याच्याबाबत वरिष्ठ पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून उघडे याला रात्री ताब्यात घेतले, तर जाधव हा जळगाव जिल्ह्यातील भडगाव शिवडी परिसरात असल्याचे मोबाइल लोकेशन ट्रॅक झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. बी. जगदाळे, प्रवीण कोकाटे, महेश साळुंके, सुरेश नरवडे, संतोष शेळके, विलास चारोस्कर आदी पंचवटी पोलिसांचे पथक जळगाव येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने जाधव याला बेड्या ठोकून पंचवटी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.