नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतनगर परिसरातील घरकुलच्या ए-१ इमारतीत तडीपार गुंड किरण अशोक खंबाईत वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी इमारतीमधील संशयिताच्या सदनिकेवर छापा टाकून किरण यास ताब्यात घेतले. पोलीस उपआयुक्त यांनी १५ फे बु्रवारी रोजी नऊ महिन्यांसाठी त्याला तडीपार केले होते. तरीदेखील किरण शहराच्या हद्दीत वावरत असल्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने पोलिसांनी त्याचा माग काढून अटक केली.
तडीपार गुंडास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:21 IST