शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजाचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

By admin | Updated: December 29, 2015 23:35 IST

मातंग समाजाचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

नाशिकरोड : नागपूर येथे मातंग समाजाच्या आरक्षण मोर्चावर झालेला लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मातंग समाजातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या. नागपूर येथे मातंग समाजाच्या आरक्षण मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बाळासाहेब अस्वले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागपूर येथे राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी काढलेल्या मोर्चावर लाठीहल्ला करून ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वृद्ध महिला, पुरूष, लहान मुले जखमी झाले. मातंग समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज असताना सरकार मात्र चर्चा करून मुद्दा सोडविण्या- ऐवजी दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चावर लाठी हल्ला केला त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अण्णा भाऊ साठे महामंडळाचा कर्जपुरवठा सुरळीत करून मंडळावर अध्यक्ष नेमण्यात यावा, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड नुसार आरक्षण मिळावे, लहुजी साळवे आयोगा अंतर्गत समाजातील बेरोजगार मुलांना शहरात मुख्य ठिकाणी व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर बाळासाहेब अस्वले, भारत जाधव, साहेबराव शृंगार, रावसाहेब अस्वले, सुधाकर गायकवाड, लहू घोडे, कृष्णाजी बलसाने, समाधान घोडेस्वार, किशोर साठे, पप्पू दिग्रसकर, शंकर पालके, रामचंद्र तांबे, चंद्रकांत आल्हाट आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)