शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी-बिघाडी, घडलंय-बिघडलंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:25 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर प्रचाराने जोर धरला असून, उमेदवार आणि त्यांच्या व्यक्तिगत प्रचाराबरोबरच आघाडी- बिघाडी, घडलंय-बिघडलंय, अहं भ्रष्टाचारामी असे अनेक पक्ष समर्थक विरोधकांचे पेजेसवर विरोधी माहिती दिली जात आहे. त्यात केवळ विरोधी मुद्देच नाही तर सकारात्मक बाजू आणि व्यंगचित्रे, टीकाटिप्पणी देखील केली जात असल्याने प्रबोधनाबरोबरच मनोरंजनदेखील होत आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर धम्माल : प्रचारासाठी अफलातून फेसबुक पेजेस

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर प्रचाराने जोर धरला असून, उमेदवार आणि त्यांच्या व्यक्तिगत प्रचाराबरोबरच आघाडी- बिघाडी, घडलंय-बिघडलंय, अहं भ्रष्टाचारामी असे अनेक पक्ष समर्थक विरोधकांचे पेजेसवर विरोधी माहिती दिली जात आहे. त्यात केवळ विरोधी मुद्देच नाही तर सकारात्मक बाजू आणि व्यंगचित्रे, टीकाटिप्पणी देखील केली जात असल्याने प्रबोधनाबरोबरच मनोरंजनदेखील होत आहे.सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यापासून पारंपरिक प्रचार साधनेच्या तुलनेत अन्य प्रचार वाढत आहेत. कोणतीही निवडणूक असो नसो नेत्यांच्या नावांचे ग्रुप आणि फॅन्स क्लब हे केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरच नव्हे तर फेसबुक पेज, इन्स्टाग्रामवरदेखील उपलब्ध आहेत. त्या पानांसाठी लाइक्स भरपूर मिळतात. तसेच टीकाटिप्पणीदेखील होत असते. लोकसभा निवडणुकीत अनेक फेसबुक पेजेस तयार झाले होते, परंतु आता विधानसभेसाठी हजारो इच्छुक असल्याने त्यातील बहुतांशी इच्छुकांनी सोशल मीडियावर आपले अकाउंट केले आहेत, तर काहींनी पेजेस केले आहे. फक्त भाऊच आमदार, ताईसाहेब किंवा मतदार संघनिहाय किंवा अन्य उमेदवार आणि पक्षाच्या नावाने अधिकृत नमूद करून अनेक पेजेस तयार करण्यात आले आहेत.डिस्ट्रॉय फरक, शिवसेना परत असेदेखील एक समर्थकांचे पेज आहे. या पेजेसवरील मजकुरापेक्षा त्यातील कॉमेंट्सदेखील लक्षवेधी असतात. काही वेळा खिल्ली उडविली जाते. तर काही वेळा कॉमेंट्स टाकणाऱ्यांमध्ये वाद-विवाद टीकाटिप्पणीदेखील केली जाते. अर्थात, फेसबुकवर अनेक प्रकारची माहिती किंवा तयार करणारा वगैरे फेक असू शकतात. त्यामुळे वृत्तपत्रातील माहितीच अधिक विश्वासार्ह असते, असे यासंदर्भात वाचकांचे म्हणणे आहे. फेसबुकवरील माहिती केवळ मनोरंजक ठरते, असेही अनेकांचे म्हणणे आहे. व्यक्तिगत पेजेस पलीकडे राजकीय पक्ष समर्थक आणि विरोधकांनीदेखील पेजेस तयार केले असून, सध्या निवडणुकीत त्याचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. आघाडी-बिघाडी हे आघाडीच्या विरोधातील पेज दिसत आहे, तर ‘अहं भ्रष्टाचारामी’तदेखील आघाडीच्या विरोधातील प्रकरणे आहेत. ‘फक्त देवेंद्र’ हे मुख्यमंत्र्यांच्या समर्थनाचे जसे पेज आहे तसेच ‘कॉँग्रेस बरी होती राव’ असेदेखील पेज आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mediaमाध्यमे