शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:09 IST

अंबड येथील दत्तनगर परिसरात महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी फेरीवाला क्षेत्र कार्यान्वित केलेले असताना काही भाजीपाला व्यावसायिक हे दिलेल्या जागेत व्यवसाय न करता दुसऱ्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहे. परिणामी मनपाने दिलेल्या ठिकाणी बसणाºया भाजीविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून, अतिक्रमण करून व्यवसाय करणाया विक्रेत्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी विक्रेत्यांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.

सिडको : अंबड येथील दत्तनगर परिसरात महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी फेरीवाला क्षेत्र कार्यान्वित केलेले असताना काही भाजीपाला व्यावसायिक हे दिलेल्या जागेत व्यवसाय न करता दुसऱ्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहे. परिणामी मनपाने दिलेल्या ठिकाणी बसणाºया भाजीविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून, अतिक्रमण करून व्यवसाय करणाया विक्रेत्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी विक्रेत्यांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. अंबड येथील दत्तनगर परिसरात महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा कार्यन्वित केली आहे. या ठिकाणी परिसरातील सुमारे ९० टक्के विक्रेते व्यवसाय करीत असून, यातील काही व्यावसायिक मात्र मनपाने दिलेल्या जागेत व्यवसाय करीत नसून अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहे. कारगील चौकात अतिक्रमण करून व्यवसाय करणाºया व्यावसायिकांवर कारवाई करावी यासाठी शुक्रवारी साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या सिडको विभागीय कार्यालवार भाजीविक्रेत्यांनी मोर्चा काढत अतिक्रमण करून व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मनपाकडे केली.  मनपाने भाजीविके्रत्यांसाठी स्वतंत्र जागा दिलेली असतानाही जे व्यावसायिक अतिक्रमण करून व्यवसाय करीत असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, संबंधित विक्रेत्यांवर मनपाने त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे. यावेळी साहेबराव दातीर याच्यासह भाजीपाला विक्रेते लता गायधनी, उषा दोंदे, वैशाली धात्रक, भीमा गुळवे, सारिका गुळवे, शोभा काकड, प्रमिला प्रजापती, सुमन भालेराव, ममता महाजन, मंगला पाटील आदींसह शेकडो व्यावसायिक सहभागी झाले होते.मनपाच्या वतीने अंबड येथील दत्तनगर भागात अधिकृत भाजी विक्रेत्यांसाठी फेरीवाला क्षेत्र कार्यन्वित केलेले असल्याने या ठिकाणी भाजीविक्रेते व्यवसाय करीत आहेत. परंतु यातील काही भाजीविक्रेते हे मनपाने ठरवून दिलेल्या जागेत व्यावसाय न करता रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत असल्याने फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. संबंधित भाजीविक्रेत्यांवर मनपाने कारवाई करावी.- साहेबराव दातीर, अंबड

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका