शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस आदिवासींच्या विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:42 IST

आदिवासी म्हणून शासकीय सेवेत असलेल्या बोगस आदिवासींचा शोध घेऊन त्यांच्या नोकºया रद्द करण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी बिरसा मुंडा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी विकास आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नाशिक : आदिवासी म्हणून शासकीय सेवेत असलेल्या बोगस आदिवासींचा शोध घेऊन त्यांच्या नोकºया रद्द करण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी बिरसा मुंडा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी विकास आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.  गोल्फ क्लब मैदान येथून निघालेला मोर्चा त्र्यंबक नाका सिग्नलवर आल्यानंतर यावेळी कार्यकर्त्यांनी काहीकाळ रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत आयुक्तालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. बोगस अदिवासींनी शासनाच्या अनेक विभागांतील नोकºया काबीज केल्या असून, बोगस आदिवासींच्या नोकºया रद्द करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी बोगस आदिवासींना नोकºयांतून काढून टाकण्याचा निर्णय दिलेला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध करण्यात आला.  राज्यव्यापी उठाव बिरसा ब्रिगेडचे राज्य संघटक जयवंत वानोळे, पांडुरंग व्यवहारे, डॉ. अरविंद कुठमुथे, अ‍ॅड. योजना बेंडकोळी, जीवन फोफसे, अ‍ॅड. रामदास भडंगे, दीपक बहिरम, मोहन उंडे, मनोहर गायकवाड, रवींद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन शासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, शासकीय वसतिगृह बांधण्यात यावे, जात वैधता प्रमाणपत्राची अट शासनाने अनुसूचित जमातीसाठी लागू करू नये, शासकीय आश्रमशाळा या खेड्यातून तालुका पातळीवर आणाव्यात, डीबीटी पद्धत बंद करावी, शासकीय इंग्रजी आश्रमशाळा सुरू करण्यात याव्यात, जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी हजार ते सातशे क्षमतेचे आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह बांधावे, विभागीय स्तरावर आदिवासींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू कराव्यात आदी विविध मागण्यांचे निवेदन आदिवासी आयुक्तांना सादर करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक