शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

मक्याचे भाव घसरल्याने शेतकरीवर्गात निराशा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:25 IST

येवला तालुक्यात यंदा खरीप हंगामातील मका पिकाच्या उत्पादनात घट झाली असून, भावदेखील कमी होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देचिंता : चार महिन्यांपासून हमीभाव मिळेना; उत्पादन खर्चही सुटेना

मानोरी : येवला तालुक्यात यंदा खरीप हंगामातील मका पिकाच्या उत्पादनात घट झाली असून, भावदेखील कमी होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मानोरी बुदू्रक, देशमाने, मुखेड, खडकीमाळ आदी परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या मका उभ्या शेतात सडून गेल्यानंतर काही ठिकाणी चांगली राहिलेली मका शेतात उभी होती. या मकाची सोंगणी झाल्यानंतर यंदा मकाची कमतरता जाणवणार आणि पुढील काही महिन्यात मक्याचे भाव दरवर्षीपेक्षा जास्त राहणार अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला लागून होती.मात्र चार महिने उलटूनही आज ना उद्या मकाचे भाव चांगल्याप्रकारे वाढतील या आशेने मानोरी बुदू्रक परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या मकाच्या बिट्या खळ्यात पडून असून, बाजार समितीत भावदेखील सातत्याने घसरत चालल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.मकाच्या बिट्याचा गंज एकाच ठिकाणी पडून असल्याने उंदरांनी मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, आशेपोटी ठेवलेली मका आता शेतकºयांना झालेला खर्च फिटनेदेखील आवाक्याबाहेर करणार असल्याची चिंता शेतकºयांना लागली आहे. गतवर्षी कोरडा दुष्काळ असल्याने कोणत्याच पिकातून साधा उत्पादन खर्चदेखील भरून न निघाल्याने यंदा खरीप आणि रब्बी हंगामातील पिकासाठी लागणारी बियाणे, खते कृषी दुकानदारांकडून उधारी करून घेतली असून, अनेक शेतकºयांनी लोकांकडून उसनवारी करून मशागतीचा खर्च करण्याचा प्रयत्न केला होता.अनेक शेतकºयांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हजारो रुपये खर्चून मका पीक वाचविण्यात यशस्वी ठरले होते, तर अनेक शेतकºयांनी लष्करी अळीग्रस्त मकावर नांगर फिरवला होता. सोमवारी (दि.१७) लासलगाव बाजार समितीत सकाळ सत्रात मक्याला अवघा कमाल १७०२, किमान १४५२, तर सरासरी १४९० इतका भाव मक्याला मिळाल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलंडले आहे.महाआघाडी सरकारने दोन लाख रु पयांपर्यंत असलेले शेतकºयांचे पीक कर्जमाफ करण्याची घोषणा केली असली तरी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या पीककर्जधारक शेतकºयांनादेखील कर्जमाफी योजनेत समाविष्ट करण्याची मागणी शेतकरी करत असून, कर्जमाफी करण्याची प्रक्रि या तत्काळ सुरू करून सर्व शेतकरी पीक कर्जधारकांना या कर्जमाफी योजनेचा लाभ होईल, अशी योजना शासनाने तयार करणे गरजेची असल्याची चर्चा शेतकरीवर्ग करत आहेत.अवकाळी पावसाने आणि लष्करी अळीने मकाचे पीक हातून गेल्यानंतर झालेला खर्च व कृषी दुकानदारांकडून घेतलेली बियाणे, खतांचे पैसे कशाच्या आधारावर फेडावी ही मोठी द्विधा बळीराजाला लागलेली आहे. यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी होत आहे.‘कोरोना’ भीतीने मका घेण्यास टाळाटाळचीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना नावाच्या विषाणूच्या अफवेच्या धसक्यानेदेखील पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबडी खाद्य म्हणून मका घेण्यास टाळाटाळ करत असल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे दिसून आले आहे. यंदा जून महिन्यात समाधानकारक पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली होती. पिके दर्जेदार आलेली असताना अचानक मका पिकावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीने प्रादुर्भाव केल्याने निम्म्याहून अधिक शेतकºयांच्या मका खराब होऊन गेल्याचे दिसून आले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड