शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळचा वीजपुरवठा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:33 IST

ब्राह्मणगाव : येथील गावाला सायंकाळी होणारा सिंगल फेज वीजपुरवठा तीन-चार दिवसांपासून सारखा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने गावाला होणारा सायंकाळचा सिंगलफेज वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्राह्मणगाव : येथील गावाला सायंकाळी होणारा सिंगल फेज वीजपुरवठा तीन-चार दिवसांपासून सारखा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने गावाला होणारा सायंकाळचा सिंगलफेज वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ब्राह्मणगाव शेतशिवारात सटाणा, अजमीर सौंदाणे, महालपाटणे व लखमापूर या चार उपकेंद्रांतून शेतपरिसरातील शेतीपंपासाठी तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री असा थ्रीफेज पुरवठा दिला जातो. सदर वेळापत्रक सटाणा विभागाचे असून, काही उपकेंद्रांचा शेतीपंपासाठी दिला जाणारा थ्रीफेज सप्लाय वेळेत व वार वेगळा आहे.ब्राह्मणगावच्या शेतशिवाराचा परिसर मोठा असून, अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतशिवारात वास्तव्यास आहेत. काही कुटुंबांनी आपल्या घरासाठी घरगुती वीज मीटर जोडले असून, शेतशिवारात काही ठिकाणी सिंगलफेज वीजपुरवठा कार्यान्वित आहे, तर काही परिसरात शेतकरी सिंगलफेज वीजपुरवठ्यापासून वंचित आहेत, उत्तर दिशेकडील शेतशिवार परिसरात डोंगराळ भाग असून, रात्री सिंगलफेज वीजपुरवठा नसल्यामुळे भीतीचे वातावरण आहे, वेळोवेळी याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी सिंगल फेज वीजपुरवठ्याची मागणी केली आहे.---------------------------यावेळेत शेतीपंपाला दिला जाणारा थ्रीफेज सप्लाय गेल्यानंतर सायंकाळी बºयाच ठिकाणी शेत परिसरात सिंगल फेज नाही. त्यामुळे शेतपरिसरातील नागरिक सिंगल फेज करून घेत असल्याने गावाला दिला जाणारा सायंकाळचा सिंगल फेज सप्लाय सारखा खंडित होत असतो, तर काही वेळात परत वीजपुरवठा सुरू झाल्यावर उच्च दाबाचा किंवा कमी दाबाचा वीजपुरवठा सुरू होताच घरगुती उपकरणांमधील तांत्रिक बिघाड तसेच जळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अगोदरच उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना त्यात वीजपुरवठा सारखा खंडित होणे तर घरगुती उपकरणे जळणे तसेच उपकरणांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन दुरुस्तीचा आर्थिक फटका ग्राहकांना बसत आहे.-----------------------------काही शेतशिवारात सायंकाळचा सिंगलफेज वीजपुरवठा नसल्यामुळे काही शेतकरी सिंगलफेज करून घेत जास्त व्होल्टेजच्या उपकरणांचा वापर करीत आहेत. त्यामुळे गावाला दिला जाणारा सायंकाळचा सिंगल फेज वीजपुरवठा खंडित होत आहे. शेतशिवारातील नागरिकांनी सिंगलफेज पुरवठा वेळात जास्त व्होल्टेजच्या शेगडी, हिटर आदी उपकरणांचा वापर टाळावा.- दीपक गांगुर्डे,कनिष्ठ अभियंता, ब्राह्मणगाव.

 

टॅग्स :Nashikनाशिक