शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव आगाराच्या एसटीतून मालवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:35 IST

पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे एसटीत प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी पिंपळगाव आगाराने एसटीमधून मालवाहतूक सुरू केली आहे. शहरातून पहिली मालवाहतूक पिंपळगाव ते वाशीपर्यंत बसने रवाना करण्यात आली.

पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे एसटीत प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी पिंपळगाव आगाराने एसटीमधून मालवाहतूक सुरू केली आहे. शहरातून पहिली मालवाहतूक पिंपळगाव ते वाशीपर्यंत बसने रवाना करण्यात आली.या सेवेचा शुभारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी अनुष्का ट्रेडर्सचे संचालक गणेश जाधव, समर्थ ट्रेडिंगचे बाळकृष्ण थोरात, पिंपळगाव आगाराचे व्यवस्थापक विजय निकम, मच्छिंद्र पवार, अशोक गांगुर्डे, चालक संतोष चोले, पप्पू शेवाळे, संदीप कुयटे, संतोष आगळे आदी उपस्थित होते. पिंपळगाव आगारामध्ये अशा १५ मालवाहू ट्रक असून, मालवाहतूक व्हावी, यासाठी विशेष कक्षही स्थापन करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी एसटीच्या ट्रकमधून जिल्ह्याबाहेर माल वाहतूक करण्यात आल्याने व्यापारी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर मालवाहतुकीसाठी पिंपळगाव आगारात संपर्ककरून या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख विजय निकम यांनी केले आहे. तर मार्केट दरापेक्षा माफक दरात एसटीची माल वाहतूक सेवा मिळाल्यामुळे बसचा पर्याय निवडला असल्याचे गणेश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक