शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंडशिपदिनी उत्साहाला उधाण

By admin | Updated: August 8, 2016 01:07 IST

कॉलेजरोडवर धूम : मित्र-मैत्रिणींनी गाठले त्र्यंबकेश्वर; सोमेश्वरलाही गर्दी

नाशिक : मैत्रीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या आणि नव्या मैत्रीचा अध्याय सुरू करण्याचा फ्रेंडशिप दिवस कॉलेज तरुण-तरुणींनी उत्साहात साजरा केला. कॉलेजरोडवर तरुणाईला उधाण आले होते. लाल रंगाचे फुगे आणि रेशीमबंधाने मैत्रीची भावना व्यक्त करण्यात आली. रविवार असल्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये मैत्रीचा दिवस साजरा करणे शक्य नसले तरी कॉलेजरोडवर मात्र तरुण-तरुणींनी एकमेकांना मैत्रीचे बंध बांधून आपले मित्रप्रेम अधिक घट्ट केले. एकमेकांना मैत्र दिनाच्या शुभेच्छा देत भेटवस्तूंचीही देवाण-घेवाण केली. तरुण-तरुणींच्या गर्दीने परिसरातील कॉफी शॉप आणि स्नॅक्स सेंटर गजबजले होते. तसेच अनेकांनी सोमेश्वर येथे सोमेश्वर धबधब्यानजीक तर काहींनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन रिमझिम पावसाचा आनंद लुटत मैत्रीची भावना व्यक्त केली. दरम्यान, शहरातील ‘लव्हर्स पॉइंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदापार्ककडे मात्र कुणीही फिरकले नाही. पावसामुळे गोदापार्कची वाताहत झाली आहेच, शिवाय या परिसरात फ्रेंडशिप दिवस असल्याने पोलिसांचाही बंदोबस्त होता. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनी शहरालगतच्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आनंद घेतला. सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर प्रमाणेच पांडवलेणी, देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडी, गिरणारे रोडवरील गंमत-जंमत तसेच जव्हार रोड येथे जाऊन मैत्री दिवस साजरा केला.