शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक सायकलींचा फुकट प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:56 IST

स्मार्ट सिटी कंपनीने इलेक्ट्रिक सायकली सुरू केल्या खऱ्या परंतु त्यासाठी डॉक म्हणजेच सायकल स्टॅण्डवर इलेक्ट्रिक ‘चार्जिंग’ची व्यवस्था नाही. यामुळे संबंधित सेवा देणाºया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या सायकली चार्जिंगसाठी दररोज त्यांची ने-आण करण्याची कसरत करावी लागत आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीने इलेक्ट्रिक सायकली सुरू केल्या खऱ्या परंतु त्यासाठी डॉक म्हणजेच सायकल स्टॅण्डवर इलेक्ट्रिक ‘चार्जिंग’ची व्यवस्था नाही. यामुळे संबंधित सेवा देणाºया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या सायकली चार्जिंगसाठी दररोज त्यांची ने-आण करण्याची कसरत करावी लागत आहे. शिवाय या सायकली सांभाळण्याचे मोठे आव्हान संबंधित कंपनीसमोेर आहे.स्मार्ट सिटी कंपनीने नाशिक शहरात बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. त्यामुळे या सेवेत आणखी बदल करून पर्यावरणपूरक सेवा देण्याचा पुढील टप्पा म्हणून इलेक्ट्रिकल सायकली आणण्यात आल्या आहेत. गेल्या गुरुवारी (दि.१८) या उपक्रमाचे उद््घाटन महापालिकेच्या राजीव गांधी भवनात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते तसेच कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रायोगिक तत्त्वावर पंचवीस सायकली नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, कंपनीच्या अध्यक्षांसमोर घाईघाईने उद््घाटन करताना सायकल स्टॅण्डवर या सायकलींच्या चार्जिंगची कोणतीही व्यवस्था केली गेलेली नाही. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळ संबंधित कंपनीच्या कर्मचाºयांना नवेच काम लागून गेले आहे.सायकलींना चांगला प्रतिसादसायकलींनादेखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा स्मार्ट सिटी कंपनीचा दावा आहे. ही सायकल तीन प्रकारात ती चालविता येते. सायकलीचा वेग ताशी २५ किलोमीटर आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ती सायकल तीस किलोमीटर चालते. या सायकलसाठी २० रु पये प्रति अर्धातास अशी भाडे निश्चित करण्यात आले आहे, तर मासिक पास १७५ रु पये असून, एका दिवसासाठीदेखील पास मिळू शकतो. मात्र तिमाही, सहामाही वा वार्षिक आकारणीचे दर अद्याप निश्चित झालेले नाही.रात्री सायकली घेऊन जाणे आणि नंतर पुन्हा या सायकली चार्ज करून स्टॅण्डवर आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे तेही त्रस्त झाले आहेत.कंपनीने सायकल स्टॅण्डवरच चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर अकारण सुरू असलेला हा त्रास थांबेल, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.पंचवटीत मनपाचे विभागीय कार्यालय, दिंडोरी नाका, शासकीय रु ग्णालय, प्रमोद महाजन उद्यान, जेहान सर्कल, महापालिका मुख्यालय येथील थांब्यांवर इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध आहेत.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीCyclingसायकलिंग