दोन हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या निवडक गावांमधील जे विद्यार्थी शाळा शिकत आहेत अथवा जे विद्यार्थी किमान दहावी इयत्ता उत्तीर्ण आहेत, असे शाळाबाह्य विद्यार्थीदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या अभ्यासिकांमध्ये संगणक, इंटरनेट तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी पुस्तके, विविध खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित गावातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी विशिष्ट कौशल्य प्राप्त करण्याची संधी या उपक्रमाद्वारे मिळणार आहे. त्यामुळे अल्पावधीत कोर्स पूर्ण करून संबंधित विद्यार्थांना नोकरीची हमी दिली जाणार आहे. यासाठी 'प्रथम' या संस्थेबरोबर सारडा उद्योग समूह संलग्न असून त्यांच्या माध्यमातून या संधी उपलब्ध होणार आहेत.या उपक्रमासाठी इच्छुक सिन्नर व नाशिक तालुक्यातील गावांमध्ये विनामूल्य तत्त्वावर ग्रामपंचायत अथवा खासगी जागा मालकांकडून किमान तीनशे चौरस फूट बांधीव जागा उपलब्ध झाल्यास अशा गावांमध्ये प्राधान्याने हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. इच्छुकांनी श्रीरंग किसनलाल सारडा चॅरिटेबल फाऊंडेशन, कॅमल हाऊस, नाशिक पुणे रोड, नाशिक येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:16 IST