वागदर्डी येथे सौभाग्य योजनेतंर्गतदरेगाव - चांदवड तालुक्यातील वागदडी येथे म.रा.वि.वि.कंपनीच्या मनमाड ग्रामीण यांच्या तर्फे मनमाड विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वाघदर्डी गावात सौभाग्य योजने अंतर्गत ४० ते ४५ वीज कनेक्शन ग्राहकाचे घरी जाऊन जोडणी करून देण्यात आले.ग्राहकांकडून कुठलेही वीज कोटेशन अनामत न भरता वीज कनेक्शन करणेत आले. तसेच दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना मोफत विज कनेक्शन असून इतर ग्राहकांसाठी पाचशे रूपये हे विज बिलात भरणे गरजेचे आहे अशी माहिती सहाय्यक अभियंता विजय भोई यांनी दिली.यावेळी सहा. अभीयंता भोई यांच्या सह कर्मचारी प्रकाश पवार,राजेन्द्र नरोटे, अनिल सोनवणे,भगवान गायकवाड,दिलीप गायकवाड, मक्तेदार कुणाल ठाकरे यांच्यासह माजी सरपंच प्रकाश जैन ,परशराम झाल्टे ,न्यानेश्वर पगार, विठ्ठल झाल्टे आदीं उपस्थिती होते.
मोफत वीज कनेक्शन वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:20 IST
दरेगाव - चांदवड तालुक्यातील वागदडी येथे म.रा.वि.वि.कंपनीच्या मनमाड ग्रामीण यांच्या तर्फे मनमाड विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वाघदर्डी गावात सौभाग्य योजने अंतर्गत ४० ते ४५ वीज कनेक्शन ग्राहकाचे घरी जाऊन जोडणी करून देण्यात आले.
मोफत वीज कनेक्शन वाटप
ठळक मुद्दे पाचशे रूपये हे विज बिलात भरणे