नाशिक : महाराष्ट्रात होणार्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर शक्ती विकास अकॅडमी या संस्थेच्या वतीने २८ ते ३१ मे दरम्यान युवकांसाठी मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. अर्ज करणार्या अनेक उमेदवारांना परीक्षेचा अनुभव नसतो. त्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, अधिक माहितीसाठंी आयटीआय लिंकरोड, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ, कामटवाडे येथे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप यांनी केले आहे.
मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
By admin | Updated: May 27, 2014 01:15 IST