शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या धर्तीवर नाशकात मॉल्समध्ये फ्री पार्किंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:26 IST

पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्किंग फ्री करण्याचा प्रस्ताव असून, महापौर रंजना भानसीदेखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाशिक : पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्किंग फ्री करण्याचा प्रस्ताव असून, महापौर रंजना भानसीदेखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.शहरात मॉल्सची संख्या वाढत आहे. परंतु सर्वच ठिकाणी पार्किंगचे शुल्क आकारले जातात. अनेक मॉल्सला महापालिकेने वाहनतळाच्या जागेसाठी चटई क्षेत्र मुक्तची सवलत दिली आहे. मात्र, पार्किंगसाठी शुल्क आकारून संबंधित मॉल्सचालक नियमाचा भंग करतात. अनेक मॉल्समध्ये तर दुचाकी किंवा चारचाकी मोटार प्रवेशाच्या वेळीच शुल्क घेऊन पावती दिली जाते आणि नंतर मात्र ती पावती मॉलमधून बाहेर पडताना परत घेतली जाते. त्यामुळे शासनाच्या कर चोरीचा हा प्रकार असल्याचीदेखील चर्चा आहे. मॉल्सचालक शुल्क घेत असल्याने अनेक नागरिक मॉलच्या बाहेरच वाहने लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडीदेखील होत असते.दरम्यान, महापालिकेच्या नगररचना अधिनियमात व्यावसायिक आस्थापनांसाठी वाहनतळासाठी जागा सोडणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांचा भार त्यांनीच सांभाळला पाहिजे, परंतु मॉल्सचालक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नि:शुल्क वाहनतळ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णय नाहीसिडको विभागातील प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेविका किरण गामणे यांनी यासंदर्भात गेल्या गुरुवारी (दि.२०) झालेल्या महासभेत प्रस्ताव मांडला होता. तसेच शहरातील मॉलमधील पार्किंग फ्री करण्याठी महासभेत फलक फडकावला होता. महापालिकेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीमुळे आचारसंहिता सुरू असल्याने २५ जून रोजी यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, महापौर रंजना भानसी यांनी नागरी हिताचा निर्णय असल्याने तो अमलात आणला जाईल, असे सांगितले.नियमाचा भंगशहरात मॉल्सची संख्या वाढत आहे. परंतु सर्वच ठिकाणी पार्किंगचे शुल्क आकारले जातात. अनेक मॉल्सला महापालिकेने वाहनतळाच्या जागेसाठी चटई क्षेत्र मुक्तची सवलत दिली आहे. मात्र, पार्किंगसाठी शुल्क आकारून संबंधित मॉल्सचालक नियमाचा भंग करतात. अनेक मॉल्समध्ये तर दुचाकी किंवा चारचाकी मोटार प्रवेशाच्या वेळीच शुल्क घेऊन पावती दिली जाते.

टॅग्स :Parkingपार्किंगNashikनाशिक