मानोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले असून ऑक्सिजनचा तुटवडादेखील जाणवू लागला आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करत भोकणी येथील बंधन फाउंडेशन पुढे सरसावले असून भोकणी गावातील रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन सेवा पुरवण्याचे काम ते करत आहेत.गावातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास संबंधित व्यक्तीशी संपर्क करण्याचे आवाहनदेखील फाउंडेशनमार्फत करण्यात आले आहे. आजपर्यंत बंधन फाउंडेशनतर्फे अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड, औषधोपचार तसेच इतर बाबींसाठी मदत करण्यात आलेली आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष राजू सानप, उपाध्यक्ष सदाशिव सांगळे, वसंत साबळे, सचिव विष्णू बांगर, हिरामण भाबड, गणेश सानप, दिलीप सोनवणे, मधुकर ठाकरे, तात्या सानप, रतन सांगळे, सतीश मोकळ, सौरभ गोसावी, उस्मान सय्यद, उमेश ननावरे आदी परिश्रम घेत आहेत.
भोकणी गावच्या रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:16 IST
मानोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले असून ऑक्सिजनचा तुटवडादेखील जाणवू लागला आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करत भोकणी येथील बंधन फाउंडेशन पुढे सरसावले असून भोकणी गावातील रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन सेवा पुरवण्याचे काम ते करत आहेत.
भोकणी गावच्या रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन
ठळक मुद्देऑक्सिजनची आवश्यकता असल्यास संबंधित व्यक्तीशी संपर्क करण्याचे आवाहन