आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत कोरोना महामारीत उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन देण्यासाठी मुंबई येथील श्री चंपक गुरू चॅरिटेबल ट्रस्टचे परमपूज्य पारस गुरुदेव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. नाशिक शहरातील हॉस्पिटलमधील रुग्णांना दररोज मोफत भोजन दिले जात आहे. या कामी सर्व समाज बांधवांनी हातभार लावलेला आहे. गुरुदेव श्री चंपक गच्छ नायक तपस्वी राज परमपूज्य पारस गुरुदेव यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक शहरातील देवलाली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तसेच मुंबईतील रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत अन्नदान केले जात आहे. या मोहिमेत श्री चंपक गुरु चॅरिटेबल ट्रस्टचे कमलेशभाई ठोसनी, धीरूभाई तुरेखीया, तुषारभाई मेहता, सारिका मेहता, प्रदीपभाई छोरिया, राजेंद्रभाई लोढा आदी सहभागी झाले आहेत.
(फोटो १२ चंपक)