शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

ठाणगाव येथे बिबट्याचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:07 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील मारुतीचा मोडा परिसर व आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी भागात दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील मारुतीचा मोडा परिसर व आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी भागात दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.मारुतीचा मोडा परिसरात जंगलात वृक्षाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात वन्यप्राण्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा आहे. परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने जंगलातील मोर, बिबटे, तरस, लांडगे आदी वन्य प्राणी दिवसाही पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. शेतकरी दिवसभर शेतात काम करतांना आपला जीव मुठीत धरु न काम करतात. मोडा परिसरातील शिवाची नळी परिसरात बिबट्याची दहशत दिवसाही दिसत आहे. याच भागात मोरांचे प्रमाण जास्त असून बिबटेही दिवसा या भागात पाण्याच्या शोधार्थ भटकंती करतांना दिसत आहे. या भागात शेतमजूर कामासाठी जाण्यासाठी धजावत नाही. जास्त रोजदारी दिली तरीही मजूर या भागात कामासाठी जात नाही. उन्हाच्या तीव्रतेने बिबटे जंगला बाहेर येत आहे. आडवाडी रोडलगत बेल टेकडी परिसरात डोंगराला कपार असल्याने कपारीत बिबट्याचे वास्तव्य त्या भागात कायम असून शेतकरी आपला जीव मुठीत धरु न शेतात काम करत आहे. वनविभागाच्यावतीने या दोन्ही ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे.वनविभागाचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये घबराटमारु तीचा मोडा परिसरातील शिवाची नळी भागात बिबटे व वन्य प्राण्यांना पिण्यासाठी ठिकठिकाणी पाणवठे उभारले तर दिवसाढवळ्या बिबटे मानवी वस्तीकडे चाल करणार नाहीत. ऐन पावसाळ्यात बिबट्यासाठी पाणवठे उभारण्याची मागणी होत आहे. वनविभागाच्या वतीने पाणवठे उभारून त्यावर देखरेखीसाठी मजुराची नियुक्ती केली तर परिसरातील जंगलतोड करणाऱ्यावर नियंत्रण येईल व बिबट्यासाठी पाण्याची सोय झाल्याने बिबटे देखील मानवी वस्तीकडे फिरकणार नाही, यासाठी वनविभागाने पाऊले उचलावी अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक