शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला गरजवंतांसाठी मोफत भोजन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:13 IST

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनमुळे बऱ्याच हातावर पोट भरणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तसेच घरातील कर्त्याधर्त्या महिला ...

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनमुळे बऱ्याच हातावर पोट भरणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तसेच घरातील कर्त्याधर्त्या महिला अथवा पुरुषास जर कोरोनाची लागण होऊन तो अथवा ती हॉस्पिटलमध्ये दाखल असेल किंवा विलगीकरणात घरी, कोविड सेंटरला भरती असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाची जेवणाची आबाळ होते. ही गरज ओळखून हा मोफत भोजन सेवेचा उपक्रम हाती घेण्यात आला. कोरोनाचे संकट आणि या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने घातलेले कठोर निर्बंध यामुळे हातावर पोट भरणार्‍या गरजू लोकांची जेवणाची गैरसोय दूर करण्यासाठी मोफत भोजन सेवा केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे राहुल चोथवे यांनी सांगितले. येथील तानाजी चौकात एचडीएफसी बँकेसमोरील विमल बंगला येथे पार्सल सुविधेकरिता भोजन सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.

इन्फो

लॉकडाऊन असेपर्यंत सेवा

लॉकडाऊन सुरू असेपर्यंत हा सेवेचा उपक्रम सुरु ठेवण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले. पहिल्या दिवशी २२० लाभार्थ्यांनी यात उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील काही रुग्ण, नातलग, कर्मचारी तसेच सुविधा केंद्रावर अनेक गरजवंतांनी याचा लाभ घेतला. दररोज सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत गरजूंना केवळ पार्सलद्वारे भोजन सेवा देण्यात येणार आहे.

फोटो - २४ सिन्नर अन्नदान

सिन्नर येथे कै. गंगाधर चोथवे चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व विमल वस्त्र भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भोजन सेवा उपक्रम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी राहुल चोथवे, महेंद्र तारगे, ज्ञानेश्वर तांबे व संस्थेचे पदाधिकारी.

===Photopath===

240421\24nsk_31_24042021_13.jpg

===Caption===

फोटो - २४ सिन्नर अन्नदान  सिन्नर येथे कै. गंगाधर चोथवे चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा ग्रामीण बिगतशेती सहकारी पतसंस्था व विमल वस्त्र भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भोजन सेवा उपक्रम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी राहुल चोथवे, महेंद्र तारगे, ज्ञानेश्वर तांबे व संस्थेचे पदाधिकारी.