शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र एन्ट्री

By admin | Updated: January 11, 2017 00:26 IST

नूतनीकरणाची कामे : अधिकाऱ्यांचीच दिशाभूल; कॅन्टीनलाही दाखविला ठेंगा

संदीप भालेराव : नाशिकअकरा महिन्यांपूर्वी विद्यापीठात दाखल झालेल्या कुलगुरूंनी नवीकोरी गाडी खरेदी केल्यानंतर आता कुलगुरूंच्या गाडीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचे काम विद्यापीठात सध्या सुरू आहे. यासाठी या मार्गावरील कॅन्टीन बंद करून विद्यापीठाच्या मागील बाजूस कॅन्टीन स्थलांतरित करण्यात आली आहे.  नवा गडी नवा राज याप्रमाणे शासकीय अधिकारी बदलीच्या ठिकाणी अनेक बदल करीत असतात. त्यास कुलगुरू म्हैसेकर हेदेखील अपवाद ठरलेले नाही. शासकीय शिस्तीला प्राधान्य देणारे आणि वाणीपेक्षा कागदाला महत्त्व देणारे अधिकारी म्हणून त्यांची अल्पावधीतच विद्यापीठात ओळख झाली. त्यामुळे बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखविणाऱ्या कुलगुरूंनी फारशी चर्चा होऊ न देता नवी गाडी मिळवून त्यासाठी व्यवस्थापन परिषदेकडून जादा खर्चाची तरतूदही करवून घेतली. त्यासोबत अन्य तीन गाड्यादेखील मंजूर करण्यात आलेल्या आहेत. तत्कालीन कुलगुरुंच्या वाहनांवरील खर्चाचाबाबत आक्षेप घेण्यात आला होता. तसा आक्षेप मात्र विद्यमान कुलगुरुंबाबत कोणीही घेतला नाही. शासकीय दरबारी वजन असल्यामुळे कुलगुरूंबाबत विद्यापीठात कोणताही विरोधाचा सूर निघाला नसल्याचे समजते. त्यातच प्रभारी कुलसचिव हेदेखील कुलगुरूंच्या जवळचे मानले जात असल्याने कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र मार्गाला कोणताही अडसर आला नाही. याउलट सर्वांसाठी सोयिस्कर अशी कॅन्टीन येथून हटविण्यात आली आहे. कॅन्टीनमध्ये कर्मचारी जास्त वेळ जाऊन बसतात म्हणून कॅन्टीन हटविण्यात आल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. नंतर मात्र कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र मार्गात कॅन्टीनचा काही भाग येणार असल्याने यात थोडेफार बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.  विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या या मार्गावर सध्या पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. कुलगुरू या नव्या मार्गाने विद्यापीठात येतील आणि जुन्या मार्गाने बाहेर पडतील, अशी नवी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. असे करण्यामागे कोणतेही विशेष असे कारण नाही, मात्र शासकीय इमारतीमध्ये अशा प्रकारची व्यवस्था असते तीच व्यवस्था येथेही असावी, असा या मागचा अट्टहास असल्याचे खासगीत बोलले जात आहे.