शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 01:39 IST

निफाड : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्यांनी येथील वृद्ध महिलेच्या दीड लाख किमतीच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.१६) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनिफाड : दीड लाखाचे दागिने हातचलाखीने लंपास

निफाड : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्यांनी येथील वृद्ध महिलेच्या दीड लाख किमतीच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.१६) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.निफाड येथील भवर गल्लीमध्ये राहणाऱ्या पद्माबाई कन्हैया चोरडिया (८१) या वृद्ध महिलेकडे शनिवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर दोन जण आले. त्यांनी पद्माबाई यांना घराबाहेर बोलावले व तुमच्या सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करून देतो, असे सांगितले. पद्माबाई यांनी त्यांच्या हातातील दीड लाख रुपये किमतीच्या पाच तोळे सोन्याच्या दोन बांगड्या त्यांच्याकडे दिल्या. त्यानंतर त्यातील एकाने पावडर काढली व एक ग्लास पाणी आणावयास सांगितले. पाणी आणून दिल्यानंतर त्याने सदर बांगड्यांना पॉलिश करून सदर बांगड्या पद्माबाई यांच्या पदरात ठेवून ते पसार झाले. त्यानंतर पद्माबाई यांनी पदरात बघितले असता त्यात काहीच नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना फसवणुकीबद्दल सांगितले. त्यानंतर निफाड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे . याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार नितीन मंडलिक, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पगार, राजू मनोहर हे करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी