शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:24 IST

गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवात मागणी वाढली : फूलशेतीला पावसाचा फटका; आवक घटल्याने भाव वधारले

नाशिक : गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १२५० ते १५० रुपये जाळीने विकला जात असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ होण्याची शक्यचा फूलविक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असल्याने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. यंदाही हे चित्र कायम असून, फूलबाजार गर्दीने गजबजून गेला आहे. यात सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना असून, अन्य सुगंधी फुलांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात कापडाची कृत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण, उत्सवांमध्ये खºया फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी सुंदरता भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे फूलबाजारात नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात विविध फुलांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले. नवरात्रोत्सवात विविधरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे.नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असून, दिंडोरी आणि सिन्नर परिसरातील फुलशेतीला यावर्षी परतीच्या पावसाचा फटका बसल्याने फुलांचे भाव वधारल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.असे आहेत दरझेंडू जाळी - १२५ ते १५० रुपये४मोगरा (प्रतिकिलो) - ६०० ते ८०० रुपये४अस्ट्रर - १८० ते २०० रुपये४शेवंती (प्रतिकिलो) - १५० ते २०० रुपये४गुलाब (प्रति १० नग) - १० ते १२ रुपये४साधा गुलाब (प्रति १० नग) - ८ ते १० रुपये४निशिगंधा (प्रतिकिलो) - १५० ते १८० रुपये४जरबेरा (प्रति १० नग) - ५० ते ६० रुपये४लीली (प्रती ५० नग) - १० -२५ रुपये

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय