नाशिक : देवळालीगाव येथील रोकडोबावाडी येथे आॅर्केस्ट्राची वर्गणी न दिल्याच्या कारणावरून सलीम शेख यांचा खून करणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयाने मंगळवार, दि. १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ या खुनातील चौथा संशयित अद्याप फरार असून, उपनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ आॅर्केस्ट्राची वर्गणी दिली नाही या कारणावरून मयत सलीम शेख यांच्या घरावर शनिवारी रात्री संशयित आकाश ऊर्फ ईलू जयद्रथ काकडे, सोनू जयद्रथ काकडे, जयद्रथ प्रल्हाद काकडे, गजानन प्रल्हाद काकडे यांनी दगडफेक केली़ या दगडफेकीचा जाब विचारण्यासाठी आलेले सलीम शेख यांच्यावर संशयितांनी तलवारीने वार करून गंभीर जखमी केले़ तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही मारहाण केली़. जखमी झालेल्या सलीम शेख यांना तातडीने बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तेथे उपचार सुरू असतानाच सलीम शेख यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी संशयित आकाश ऊर्फ ईलू जयद्रथ काकडे, सोनू जयद्रथ काकडे, जयद्रथ प्रल्हाद काकडे, गजानन प्रल्हाद काकडे यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यातील तिघांना उपनगर पोलिसांनी तातडीने अटक केली. या सर्वांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची कोठडी देण्यात आली. या सर्वजणांना १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. चौथा संशयित गजानन काकडे हा फरार आहे़ (प्रतिनिधी)
चौथा संशयित अद्याप फरार
By admin | Updated: May 11, 2015 01:36 IST