शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

नासाका अध्यक्षांसह चौघांचा राजीनामा

By admin | Updated: April 2, 2015 00:25 IST

कार्यस्थळावर चर्चा : जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी सोडले पद

नाशिकरोड :नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष देवीदास पिंगळेंसह चौघा जणांनी कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा बॅँकेची आगामी काळात होणारी निवडणूक लक्षात ठेवून राजीनामा दिला असल्याची कारखाना सभासदांमध्ये जोरदार चर्चा आहे.नाशिक साखर कारखाना गेल्या २०१३-१४ च्या गळीत हंगामापासून बंद पडलेला आहे. कारखाना पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी कुठल्याही स्तरांवर कोणीही ‘प्रामाणिक’ प्रयत्न न केल्याने दुसऱ्या २०१४-१५च्या गळीत हंगामात देखील कारखाना बंद आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कामगारांचे पगार देखील झालेले नाही. विशेष म्हणजे कारखान्याचे वीज बिल थकल्याने गेल्या काही महिन्यांपासून महावितरणने कारखान्याचा वीज पुरवठा खंडित केला आहे. दोन हंगामापासून कारखाना सुरू झाल्याने व सध्या वीजपुरवठा खंडित असल्याने तुर्तास तरी कारखान्याचे भवितव्य अंधारात आहे.नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष देविदास पिंगळे, संचालक तुकाराम सखाराम दिघोळे, संतु रामचंद्र पाटील, केरू नामदेव धात्रक, डॉ. सुनील उत्तमराव ढिकले यांनी आपल्या संचालक पदाचा दिलेला राजीमाना गेल्या १९ मार्चच्या संचालकांच्या बैठकीत मंजुर करण्यात आला. त्यानंतर कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांनी अध्यक्ष पिंगळे व इतर चौघांचे संचालकपदाचे राजीनामे साखर कारखान्याचे प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. तुकाराम दिघोळे, संतु पाटील व केरू धात्रक यांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला होता. मात्र तो कारखाना प्रशासनाकडे होता. पिंगळे व ढिकले यांनी आता राजीनामा दिल्याने पुर्वीचे दिघोळे, पाटील, धात्रक यांचे राजीनामे मंजुरीसाठी साखर कारखाना प्रादेशिक सहसंचालकाकडे पाठविण्यात आले आहे. अध्यक्ष पिंगळे यांनी राजीनामा दिल्याने कारखान्याच्या (बंद कारखाना) अध्यक्ष पदाचा पदभार उपाध्यक्ष जगन आगळे यांच्याकडे संचालकांच्या बैठकीत सर्वानुमते सोपविण्यात आला. जिल्हा बॅँक निवडणुकीचे वारे वाहु लागल्याने राजीनामे दिल्याची सभासदांमध्ये जोरदार चर्चा आहे. (प्रतिनिधी)