लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : वाल्मीकनगर येथील जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले (२७) याच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह ज्या चारचाकी वाहनातून नेला ती स्विफ्ट कार पंचवटी पोलिसांनी नांदूरनाका येथून जप्त केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी याच्यासह पाच सराईत गुन्हेगारांना अटक केलेली आहे. उगलमुगले याचे संशयित आरोपी अविनाश कौलकर, रोहित कडाळे, श्याम महाजन, राकेश कोष्टी, कुंदन परदेशी आदि संशयितांनी अपहरण करून त्याला ठार मारून घोटी परिसरातील एका खेडेगावात त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी अटक केली आहे, तर भाजपा नगरसेवक शेट्टी याच्या सांगण्यावरूनच ही हत्या केल्याचा आरोप शेट्टी याच्यावर असल्याने त्यांनाही चार दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. ज्वाल्याची हत्या करून त्याचा मृतदेह (एम. एच. १५ सी टी ७३३७) या स्विफ्ट कारमधून नेल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. एका संशयिताचा शोध सुरूजालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले याच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आतापर्यंत भाजपा नगरसेवक शेट्टी याच्यासह सहा संशयितांना अटक केली आहे. या हत्याप्रकरणात आणखी एका संशयिताचे नाव पुढे आल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे. अटक केलेल्या संशयितांची चौकशी केल्यानंतर आणखी एका संशयिताचा सहभाग असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
उगलमुगले खून प्रकरणातील चारचाकी जप्त
By admin | Updated: May 31, 2017 01:12 IST