शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी करतांना आढळले बिबट्याचे चार बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:24 IST

सिन्नर: तालुक्यातील सोमठाणे येथे ऊसतोडणी करतांना बुधवारी सकाळी आठ वाजता चार नवजात बछडे आढळून आले आहेत.

सिन्नर: तालुक्यातील सोमठाणे येथे ऊसतोडणी करतांना बुधवारी सकाळी आठ वाजता चार नवजात बछडे आढळून आले आहेत. त्यातील एका बछड्याला मादी घेऊन गेली असून उर्वरित तीन बछड्यांची मादीला भेट घडवून आणण्यासाठी सिन्नर वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. पूर्व भागातील सोमठाणे येथे उत्तम निवृत्ती पदाडे यांच्या दोन एक ऊसाची तोडणीचे दोन दिवसांपासून सुरु आहे. कोळपेवाडी साखर कारखान्यात ऊस तोडून नेण्यासाठी कामगार दोन दिवसांपासून ऊसतोड करीत असतांना बुधवारी सकाळी आठ वाजता ऊसाच्या शेतात चार बछडे आढळून आले. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी शेतातून काढता पाय घेतला. पदाडे यांनी याची माहिती ग्रामस्थ साईनाथ खांडेकर, मच्छिंद्र चव्हाणके, मधू ठोंबरे यांना दिल्यानंतर त्यांनी सिन्नरच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शरद थोरात, वनसेवक एम. व्ही. शिंदे, एन. एन. वैद्य, बालम शेख यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिसर निर्मनुष्य केला. थोड्यावेळाने ऊसाच्या शेतात असलेल्या मादी एक बछडा घेऊन ऊसाच्या शेतात गेली. मात्र उर्वरित तीन बछडे घटनास्थळी होते. वनविभागाच्या कर्मचाºयांनी परिसर निर्मनुष्य केला. त्यानंतर या बछड्यांना मादीची भेट घडविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. दरम्यान, मादी व बछड्यांचा वावर असल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून घटनास्थळी पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.------------------------------घटनास्थळी दोन टॅप कॅमेरे लावले वनविभागाने मादी व बछड्यांची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. बछडे न भेटल्यास मादी आक्रमक होण्याची शक्यता असते. त्यामुळे मादी बछडे घेऊन गेली पाहिजे अशी धारणा असते. या मादी बछड्यांची भेट झाली की नाही हे पाहण्यासाठी घटनास्थळी वनविभागाने बछड्यांजवळ दोन टॅप कॅमेरे लावले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक