शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दहा रुपयांच्या नाण्याने घेतला चार वर्षीय चिमुकलीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:36 IST

नाशिक : लहान मुलगी रडत असल्याने आईने खाऊसाठी दिलेले दहा रुपयांचे नाणे मुलीने नकळत गिळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़ ५) नाशिकरोडजवळील चांदगिरी येथे घडली़ शालिनी दत्तात्रय हांडगे (वय ४, रा. चांदगिरी, ता. जि. नाशिक) असे नाणे गिळल्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे़

ठळक मुद्देनाशिकरोड : चांदगिरी येथील घटना; उपचारादरम्यान मृत्यू शालिनी दत्तात्रय हांडगे नाणे गिळल्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव

नाशिक : लहान मुलगी रडत असल्याने आईने खाऊसाठी दिलेले दहा रुपयांचे नाणे मुलीने नकळत गिळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़ ५) नाशिकरोडजवळील चांदगिरी येथे घडली़ शालिनी दत्तात्रय हांडगे (वय ४, रा. चांदगिरी, ता. जि. नाशिक) असे नाणे गिळल्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे़ दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सिडको परिसरात फुगा गिळल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ त्यानंतर दहा रुपयांच्या नाण्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदगिरी येथे दत्तात्रय हांडगे हे पत्नी, मुलगा व मुलगी शालिनीसह राहतात़ रविवारी (दि़४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शालिनी रडत असल्याने वडील दत्तात्रय यांनी आपण खाऊ घ्यायला जाऊ, असे सांगितले़ तसेच खाऊ घेऊन देणार, असा विश्वास यावा यासाठी तिच्या आईने दहा रुपयांचे नाणेही तिच्याकडे दिले़ यानंतर घरकामात व्यस्त असताना अचानक शालिनीने दहा रुपयांचे नाणे तोंडात टाकले व ते तिच्या घशात अडकले़ यानंतर हांडगे कुटुंबीयांनी तत्काळ तिला महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी नेले असता आमच्याकडे स्पेशालिस्ट डॉक्टर नाही, तुम्ही दुसरीकडे हलवा, असे सांगण्यात आले़हांडगे कुटुंबीयांनी तत्काळ शालिनीला आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संशोधन केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते़ मात्र उपचारादरम्यान सोमवारी (दि़५) सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉ़ प्रज्ञा शेलूकर यांनी घोषित केले़ यानंतर शालिनीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला़ या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर दहा रुपयांचे नाणे हे तिच्या घशामध्ये अडकल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले़ दत्तात्रय हांडगे हे एका खासगी कंपनीत नोकरीला असून, शालिनी ही त्यांची एकुलती एक मुलगी होती़ दरम्यान, या घटनेची नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़