शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूररोडला चारचाकी वाहनचालकांचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:58 IST

गंगापूररोड, कॉलेजरोड भागात चारचाकी व दुचाकी वाहनचालकांनी गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घालणे सुरू केले असून, कर्णकर्कश हॉर्न, भरधाव वेग, सिग्नलकडे दुर्लक्ष करून सर्रास वाहन दामटवणे असे अनेक प्रकार घडू लागल्याने परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालक या प्रकारामुळे धास्तावले आहेत.

गंगापूर : गंगापूररोड, कॉलेजरोड भागात चारचाकी व दुचाकी वाहनचालकांनी गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घालणे सुरू केले असून, कर्णकर्कश हॉर्न, भरधाव वेग, सिग्नलकडे दुर्लक्ष करून सर्रास वाहन दामटवणे असे अनेक प्रकार घडू लागल्याने परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालक या प्रकारामुळे धास्तावले आहेत. विशेष म्हणजे गंगापूररोड व कॉलेजरोडवर एकूण चार वाहतूक सिग्नल आहेत, मात्र एकाही सिग्नलवर पोलीस नसल्याने वाहनचालकांचे फावते आणि निरपराधाला आपला जीव गमवावा लागत आहे.नाशिक शहरातील वर्दळीचा रस्ता म्हणून गंगापूररोड, कॉलेजरोडचा उल्लेख केला जात असून, या रस्त्यावर कॉलेज, क्लासेस, व्यावसायिक दुकाने, हॉटेल्सचा सर्वाधिक भरणा आहे. गंगापूर रोडने पुढे धरणावर, वाइनरी प्रकल्पाकडे जाण्यासाठी गंगापूररोड व कॉलेजरोडने चारचाकीने वाहनांना काळ्या काचा लावून वेगाने वाहन चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. जोरजोरात हॉर्न वाजवून रस्त्यावरील इतर वाहनांना त्रास होईल अशाप्रकारे वाहन चालवून अनेक लहान-मोठे अपघात करून पळून जात यशस्वी झाले, मात्र याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात साधी नोंदही नाही. अनेकांना कायमचे अधू व्हावे लागले आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका निभावताना दिसून येतात.वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूररोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकानांच्या बाहेर व हॉटेल लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने आडव्या तिरप्या उभ्या असतात. विद्या विकास सर्कलपासून ते थेट गंगापूर गावापर्यंत रस्त्यालगत असलेल्या हॉटेलचालक, लॉन्सचालक यांच्या व्यवसायामुळे हा रस्ता वाहतुकीस वा पायी चालणाऱ्यांसाठी धोकादायक झाला आहे.भरधाव वेगाने वाहन चालवून दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाºयांवर पोलिसांनी कारवाई करावी. त्यामुळे गंगापूररोड व कॉलेजरोडवर अपघातांची संख्या कमी होईल. बेशिस्त वाहनचालकांमुळे परिसरात राहणाºया नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते.- रामभाऊ तेली, स्थानिक रहिवासी

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक