शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चार विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या प्रशिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:36 IST

शहरातील भोसला गर्ल्स हायस्कूलमध्ये अठरा दिवसांपूर्वीच नियुक्त झालेल्या सहायक प्रशिक्षक सेवानिवृत्त सुभेदार मच्छिंद्र कर्पे याने चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.२३) रात्री उशिरा उघडकीस आला.

नाशिक : शहरातील भोसला गर्ल्स हायस्कूलमध्ये अठरा दिवसांपूर्वीच नियुक्त झालेल्या सहायक प्रशिक्षक सेवानिवृत्त सुभेदार मच्छिंद्र कर्पे याने चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.२३) रात्री उशिरा उघडकीस आला. याप्रकरणी संशयित कर्पे यास संस्थेने नोकरीवरून काढून टाकले असून, पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसलाच्या गर्ल्स हायस्कू लमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग चालतात. या शाळेत मुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी मेजर, सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले जाते. त्यानुसार १५ फेब्रुवारी रोजी कर्पे यास संस्थेने सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मुलाखतीदरम्यान, त्यांना संस्थेने सर्व नियम समजावून सांगितल्याचा दावा विश्वस्तांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने भोसला सैनिकी शिक्षण संस्थेला हादरा बसला आहे. अल्पवयीन मुलींनी घरी पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पालकांनी येथील मुख्याध्यापकांच्या सदर प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाला घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.घडलेली घटना अत्यंत निंदनीय अशीच आहे. चार दिवसांपुर्वी हा प्रकार घडला त्यानंतर पालकांनी ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली. जेव्हा हा प्रकार आमच्यापर्यंत पोहचला तेव्हा तत्काळ ‘विशाखा’ समितीच्या महिला सदस्यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत चौकशी सुरू केली. शनिवारी रात्री ८ वाजता चौकशी पूर्ण झाली व कर्पे हा चौकशीत दोषी आढळला. तत्काळ गंगापूर पोलिसांना माहिती देऊन कर्पे यास पोलिसांच्या स्वाधीन केले. संस्थेने या प्रकारामध्ये कुठलाही पक्षपातीपणा केला नसून निपक्ष चौकशी करत न्याय दिला. अशा पद्धतीचे वर्तन करणाऱ्यांच्या संस्था कधीही पाठीशी राहणार नाही, पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.  - डॉ. दिलीप बेलगावकर, सरकार्यवाह

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिला