शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठालगतचे चार रोहित्रं सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:18 IST

गोदावरीच्या नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावर असलेले चार रोहित्रं सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

 गोदावरीच्या नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावर असलेले चार रोहित्रं सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. सदर रोहित्रे हे वाणिज्यिक असून, यामुळे घरगुती वीजपुरवठ्यावर कुठलाही परिणाम झाला नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला. पाणी वाढल्यास आणखी रोहित्र बंद करण्यात येणार आहे.शासकीय रोपवाटिका पूल, घारपुरे घाटपूल, अहल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पुलावरून नाशिककरांनी संध्याकाळी नदीचा पहिला पूर बघण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नीळकंठेश्वर महादेव मंदिराच्या रांगेतील सर्व टपऱ्या पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. टाळकुटेश्वर मंदिराजवळील सातीआसरा चौकापासून गाडगे महाराज धर्मशाळेकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्यात हरविला होता. त्यामुळे नागरिक वळसा मारून पूर पाहण्यासाठी होळकर पुलाकडे जात होते.वाफाळलेला चहा अन् कांदाभजीगोदाकाठालगत तसेच गंगापूर परिसर, दूधसागर धबधबा, सोमेश्वर मंदिर, भाजीबाजार पटांगण, सरदार चौक, तपोवन या भागात आलेल्या पर्यटकांनी पावसात ओलेचिंब होत वाफाळलेला चहा अन् गरमागरम कांदाभजी व कणसावर ताव मारत पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. संध्याकाळी ६ वाजेनंतर गंगापूर धरणातून विसर्ग अधिक वाढल्यामुळे दूधसागर धबधबा व तपोवन गोदाकाठालगतच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने आवरून घेतली.‘दूधसागर’चा रौद्रावतार सोमेश्वरजवळील दूधसागर धबधब्याचा रौद्रावतार सोमवारी नाशिककरांना पहावयास मिळाला. गंगापूर धरणातून जसजसा विसर्ग वाढत होता तसतसा या धबधब्यावरून पाण्याचा प्रतापही वाढत होता. यामुळे नाशिककरांनी या हंगामात प्रथमच दूधसागर धबधब्याचा रौद्रावतार अनुभवला. गंगापूर धरणातून दिवसभर होणाºया विसर्गामुळे धबधब्याच्या परिसरात गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या वतीने मुख्य पादचारी रस्त्यापासून पुढे नदीपात्राजवळ जाण्यासाठी प्रवेशबंद करण्यात आला होता. दोरखंड बांधून नागरिकांना धबधब्यापासून सुरक्षित अंतरावर रोखण्यात आले.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर