मनमाड-मालेगाव रोडवर भीषण अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 06:04 PM2017-12-04T18:04:10+5:302017-12-04T18:04:21+5:30

मनमाड : मनमाड-मालेगाव रोडवर दहेगाव शिवारात भरधाव वेगातील टॅँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. मयतामधे पती-पत्नीसह माय-लेकाचा समावेश आहे. दरम्यान, सदरची घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

Four people were killed in a horrific accident on Manmad-Malegaon road | मनमाड-मालेगाव रोडवर भीषण अपघातात चार ठार

मनमाड-मालेगाव रोडवर भीषण अपघातात चार ठार

googlenewsNext

मनमाड : मनमाड-मालेगाव रोडवर दहेगाव शिवारात भरधाव वेगातील टॅँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. मयतामधे पती-पत्नीसह माय-लेकाचा समावेश आहे. दरम्यान, सदरची घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
मालेगाव रोडवरील दहेगाव शिवारात पाटील पेट्रोलपंपाजवळ मालेगावकडून मनमाडकडे येत असलेल्या होंडा शाईन गाडीला मालेगावकडून भरधाव वेगात आलेल्या टॅँकरने जोरदार धडक दिली. अपघातानंतर टॅँकरचालकाने टॅँकर पेट्रोलपंपासमोर उभा करून घटनास्थळावरून पळ काढला. अपघात इतका भयानक होता की मोटारसायकलचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातामधे संतोष रामभाऊ चितळकर (३५), आशाबाई संतोष चितळकर (३०), भूषण उत्तम चितळकर (१०), सर्व रा. बोयेगाव, ता. नांदगाव हे तिघेजण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी सविता उत्तम चितळकर (४०) यांचे मालेगाव येथे उपचार सुरू असताना निधन झाले.
रोषन संतोष चितळकर (१०), रा. बोयेगाव याच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मयतांच्या नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मालेगाव येथे उपचार सुरू असलेल्या सविता चितळकर यांच्या निधनाची माहिती कळताच नातेवाइकांच्या संतापाचा उद्रेक झाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Four people were killed in a horrific accident on Manmad-Malegaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.