शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पत्र्याच्या शेडवर  भिंत कोसळल्याने चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:52 IST

जेलरोड दसक सद्गुरू मंगल कार्यालयावर बांधण्यात येणारी भिंत पार्किंगच्या जागेत अनाधिकृत उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने मंगल कार्यालयाच्या मालकासह चौघे जण जखमी झाले आहे.

नाशिकरोड : जेलरोड दसक सद्गुरू मंगल कार्यालयावर बांधण्यात येणारी भिंत पार्किंगच्या जागेत अनाधिकृत उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने मंगल कार्यालयाच्या मालकासह चौघे जण जखमी झाले आहे. मंगल कार्यालयात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम सुरू असतांना घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोंधळ व धावपळ उडाली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जेलरोड दसक चौफुली लगत असलेल्या गुरूकृपा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजुस सद्गुरू मंगल कार्यालय असून त्या ठिकाणी सोमवारी सकाळी ११ वाजेपासून जेलरोड अमृतनगर दिप्ती रोहाऊस येथे राहाणारे नाना रामभाऊ पानसरे यांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रमानिमित्त हभप रेखाताई हांडगे यांचे प्रवचन सुरू होते. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमास सुमारे २०० ते २५० नातेवाईक, महिला, नागरिक उपस्थित होते. कार्यालयाच्या पाठीमागील एका कोपऱ्यास जेवण बनविण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार होती.  दरम्यान मंगल कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील आडव्या बिमवर मजुरांकडून भिंत बांधण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी कार्यालय मालक राजेंद्र रामचंद्र डेर्ले हे देखील उपस्थित होते. पावणेबाराच्या सुमारास अचानक मंगल कार्यालयावर बांधण्यात येणारी भिंत खाली पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने मोठा आवाज होत पत्र्याचे शेड, अ‍ॅँगल सर्व जमीनदोस्त झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे वर्षश्राद्धास उपस्थित असलेल्या नागरिक व महिलांची धांदल उडून धावपळ झाली. यामध्ये कार्यालय मालक राजेंद्र डेर्ले हे देखील वरतुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. तर खाली पत्र्याचे शेड कोसळल्याने स्वयंपाक काम करणारे वाल्मीक जनार्दन शेलार (वय २७) रा. शेरकर वाडा जुने नाशिक, संतोष दगडाची चावरे (वय ३२) रा. चेतनानगर राणेनगर, नाशिक हे दोघे जखमी झाले. तर वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमास आलेले प्रेस कामगार शैलेश जाधव हे देखील जखमी झाले असून त्यांच्या पाय फ्रॅक्चर झाला आहे. या दुर्घटनेनंतर जखमींना तत्काळ खाजगी रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सदर घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजेश आढाव, माजी नगरसेवक अशोक सातभाई, गोटू आढाव, राम वाघ आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन वर्षश्राद्धाला उपस्थित असलेल्यांना धीर दिला.चौकशी करून गुन्हा दाखल करणारनाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे प्रभाकर रायते यांनी पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी धाव घेतली. तर मनपा अग्निशामक दलाचे जवान देखील मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. सद्गुरू मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या जागेमधील अनाधिकृत पत्र्याचे शेड मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने चार वर्षापूर्वीच जमीनदोस्त केले होते. याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक