शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

क्षणात चौघे चिमुकले झाले अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:38 IST

ओझर : सय्यद पिंप्रीत बुधवारी वराडे कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला आणि नंदू व सविता वराडेंचं कुटुंबच पोरकं झालं. त्यांचे चुलत पुतणे केशव वराडे हे शेजारीच गाडी धूत असताना हा प्रकार त्यांच्या डोळ्यादेखत होत होता. काका-काकूंना वाचविण्यासाठी त्यानेदेखील पाण्यात उडी मारली आणि काही क्षणात तो देखील गाळात फसला.

ठळक मुद्देआज ते चार चिमुकले अनाथ झाले आहे.

सुदर्शन सारडा ।लोकमत न्यूज नेटवर्कओझर : सय्यद पिंप्रीत बुधवारी वराडे कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला आणि नंदू व सविता वराडेंचं कुटुंबच पोरकं झालं. त्यांचे चुलत पुतणे केशव वराडे हे शेजारीच गाडी धूत असताना हा प्रकार त्यांच्या डोळ्यादेखत होत होता. काका-काकूंना वाचविण्यासाठी त्यानेदेखील पाण्यात उडी मारली आणि काही क्षणात तो देखील गाळात फसला.मयत नंदू वराडे व सविता हे दांपत्य किसाननगर परिसरात अल्प शेतीत आपला प्रपंच चालवित होते. गुरु वारी सकाळी बैलगाडीत गोधड्या व कपडे टाकत हे दांपत्य खदाणीकडे गेले. नंदू यांनी बैल धुवून बांधून ठेवले, तर शेवटची चादर धूत असताना खाली असलेल्या शेवाळवरून सविता यांचा पाय घसरला. काही मिनिटात नंदू हे पत्नीला वाचविण्यासाठी गेले; परंतु त्यात दोघेही बुडाले. त्यांच्या पश्चात सोनाली, मोनाली, राणी या तीन मुली व एक पाच वर्षाचा मुलगा सार्थक असे चार चिमुकले आहे. सायंकाळी रु ग्णवाहिकेतून मृतदेह घरी न आणता थेट वेशीवर नेण्यात आले. हजारोंचा जनसमुदाय यावेळी शोकसागरात बुडाला. सोनाली आणि मोनाली या आठ व सात वर्षाच्या मुलींनी आपल्या आई-वडिलांना अग्निडाग, देत एकच हंबरडा फोडला तर राणी आणि सार्थक वयाने लहान असल्याने त्यांना नेमकं काय सुरू आहे हे कळत नव्हतं. त्या चारही चिमुकल्यांची परिस्थिती पाहून उपस्थितीतांची मन हेलावली. आईने सकाळी घरात करून ठेवलेला स्वयंपाक तसाच होता. राणी आणि सार्थकला यापुढे घास भरवायला आई नसणार हा विचार करूनच डोळे सुजले होते. भावंडांमध्ये नंदू वराडे हे सर्वात लहान होते. त्यांच्या पश्चात बहीण व दोन ज्येष्ठ बंधू आहेत. त्यातील एक अपंग आहे, तर दुसरे सेवानिवृत्त आहेत. केशव वराडे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. स्वभावाने सगळ्यांशी हसतखेळत राहणारा केशव लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या आत काळाने त्याला हिरावून नेले. आज ते चार चिमुकले अनाथ झाले आहे.