शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष खरेदीसाठी चार लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:02 IST

महापालिकेच्या वतीने पुण्यातील खेडमधील रानमाळाच्या धर्तीवर नाशिक शहरात लोकसहभागातून वृक्षसंवर्धन करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने पावणेचार लाख रुपये खर्च करून निविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने पुण्यातील खेडमधील रानमाळाच्या धर्तीवर नाशिक शहरात लोकसहभागातून वृक्षसंवर्धन करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने पावणेचार लाख रुपये खर्च करून निविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर यासंदर्भात कार्यवाही होणार आहे. दरम्यान, यापूर्वी अशाप्रकारचा प्रयोग राबविताना त्यास नागरिकांचा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे यंदा कितपत प्रतिसाद मिळेल, याविषयी शंका आहे.  महापालिकेच्या वतीने दरवर्षी वृक्षलागवड केली जाते आणि त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चदेखील होतो. अनेकदा महापालिकेकडून झाडे घेऊनदेखील लावली जातात. तथापि, यंदा महापालिकेनेच खास लोकसहभागातून वृक्षलागवडीचा निर्णय घेतला आहे. खेड तालुक्यात असा प्रयोग राबविण्यात आला होता. त्याच धर्तीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून वृक्षसंवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो.  स्थानिक नागरिक सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या आप्तेष्ठांच्या स्मृतिनिमित्त किंवा अन्य कारणावरून वृक्षसंवर्धन केल्यास वृक्षसंवर्धनास मदतच होणार आहे.खासगी संस्थांच्या प्रतिसादाची उत्कंठामहापालिकेच्या वतीने यापूर्वी एकदा वृक्षलागवडीसाठी लोकसहभागातून अशाप्रकारच्या वृक्षरोपणासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. विशेषत: पर्यावरणप्रेमी संस्था तसेच ज्येष्ठ नागरिक संघ यांना आवाहन करण्यात आले होते. परंतु प्रतिसाद मिळाला नव्हता. अर्थात, महापालिकेने अटी-शर्तीं घातल्या होत्या. त्यामुळे प्रतिसादच मिळाला नाही हे एक कारण असले तरी झाडे लावल्यानंतर ती टिकावी यासाठी प्रशासनाने या अटी घातल्याचेदेखील सांगण्यात येते. या घटनेला अनेक वर्षे झाली असून, आता तरी खासगी संस्था आणि व्यक्ती कसा प्रतिसाद देतात त्याविषयी उत्कंठा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका