शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव सदो शिवारात आढळली बिबट्याची चार बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:47 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारातील जंगल परिसरातील एका पडक्या झोपडीच्या पडवीत १५ दिवस वयाची चार बिबट्याची बछडे आढळून आली. दरम्यान जंगल परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसापासून बचावासाठी मादी बिबट्याने आपली पिले या झोपडीत आणून ठेवली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे पथक याठिकाणी पहारा देत आहेत.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारातील जंगल परिसरातील एका पडक्या झोपडीच्या पडवीत १५ दिवस वयाची चार बिबट्याची बछडे आढळून आली. दरम्यान जंगल परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसापासून बचावासाठी मादी बिबट्याने आपली पिले या झोपडीत आणून ठेवली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मादी बिबट्या येऊन या बछड्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जाईल. मात्र या झोपडीकडे कोणी नागरिकांनी जाऊ नये यासाठी वनविभागाचे कमर्चारी तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकाराची माहिती समजताच परिसरातील नागरिक या भागाकडे येण्यासाठी धाव घेत आहेत मात्र या झोपडीजवळ कोणालाही जाऊ दिले जात नाही. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवाराच्या जंगल परिसरात दूरवर एक निर्जनस्थळी शेतात झोपडीवजा पडवी आहे. या ठिकाणी सध्या कोणीही राहत नाही. दरम्यान सामेवारी सायंकाळच्या सुमारास एका बिबट्या मादीने आपली चार बछडे या झोपडीत सुरक्षित स्थळी आणून ठेवली. सकाळी आपल्या या चारही पिलांना सुरक्षित ठेऊन बिबट्या शिकारीसाठी जंगलात गेली.मात्र आज सकाळी ही बाब समजताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याची बछडे सुरक्षित असल्याची खात्री केली व बछड्यांसाठी मादी बिबट्या पुन्हा या ठिकाणी येऊन आपल्या पिलांना दुसऱ्या सुरक्षित स्थळी घेऊन जाईल असा वनविभागाचा अंदाज आहे. त्यामुळे याठिकाणी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदशर्नाखाली वनविभागाचे पथक याठिकाणी पहारा देत आहेत. (१७ घोटी १)

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या