शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावरील छाप्यात चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:52 IST

नांदूर गावातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पंधरा जुगाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले अ

पंचवटी : नांदूर गावातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पंधरा जुगाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोबाइल, दुचाकी, रिक्षा व जुगाराचे साहित्य असा तीन लाख ९५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.नांदूर गावातील दर्ग्याशेजारी असलेल्या प्रशांत निकम यांच्या घरात जुगार सुरू असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी संशयित सागर भोजने (रा. रामायण अपार्टमेंट, जेलरोड), सुनील चव्हाण (रा. संतनगर, दसक), कानिफ सातभाई (रा. नरहरीनगर, दसक), राजू पगार (रा. मोरे मळा, जेलरोड), किरण भालेराव (रा. मंगलमूर्तीनगर, जेलरोड), रमेश सूर्यवंशी (रा. पंचक गाव), शकील (रा. मंगलमूर्तीनगर, जेलरोड), उत्तम पगार (रा. नांदूर नाका), राजेश पटेल (रा. वैशालीनगर, जेलरोड), शंकर बहिवाल (रा. संत नरहरीनगर, जेलरोड), सूरज चोरमले, विशाल धनराळे, राजेंद्र सोनवणे (तिघे रा. नांदूर गाव), विक्रम बोराडे (रा. जेलरोड) व विवेक रसाळ (रा. वीर सावरकरनगर, जेलरोड) हे पत्त्याच्या कॅटवर पैसे लावून जुगार खेळत होते़  आडगाव पोलिसांनी या सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस ठाण्यांमध्ये नवीन वसुली अधिकारीपोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील ४० कलेक्टर अर्थात वसुली अधिकाºयांची बदली केली होती़ मात्र, या बदलीनंतर आता वसुली अधिकाºयांची दुसरी फळी विविध पोलीस ठाण्यांमध्ये तयार झाली असून, त्यांच्या कृपाशीर्वादाने अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे़चार लाखांचा मुद्देमाल जप्तआडगाव पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून १ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी, ८५ हजार रुपये किमतीची रिक्षा, ४५ हजार रुपये किमतीचे १४ मोबाइल, ६८ हजार ३४० रुपयांची रोकड व १ हजार ८०० रुपयांचे पत्त्याचे कॅट असा तीन लाख ९५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी