शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:56 IST

नाशिक : शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी आणि रिक्षाच्या अपघातांमध्ये चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोघे युवकांचा समावेश आहे. जेलरोड, चेहेडी, आडगाव, जुने नाशिक या भागात या मोटार अपघाताच्या दुर्घटना घडल्या.

ठळक मुद्देदोन युवकांचा समावेश : रिक्षा, दुचाकींना अपघात; गुन्हे दाखल

नाशिक : शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी आणि रिक्षाच्या अपघातांमध्ये चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोघे युवकांचा समावेश आहे. जेलरोड, चेहेडी, आडगाव, जुने नाशिक या भागात या मोटार अपघाताच्या दुर्घटना घडल्या.जेलरोड परिसरात रिक्षा उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रशांत सुरेश बर्वे (३८, रा. पंचक, सरस्वतीनगर, जेलरोड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याची रिक्षा अचानकपणे उलटल्याने बर्वे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत मुंबई-आग्रा महामार्गावर विरूद्ध दिशेने भरधाव दुचाकीने समोरून येणाºया दुसºया दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आडगाव शिवारात घडली. सैयद अली सैयद (पूर्ण पत्ता नाही) असे याअपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संजय नारायण माळोदे (३५, रा. दत्तमंदिर, आडगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ९ आॅगस्टला दुपारी घडली. यातील मृत्यू झालेला सैयद हा त्याच्या दुचाकीवरून (एमएच १५ एल. १३४५) विरूद्ध दिशेने भरधाव येत होता. समोरून माळोदे त्यांच्या दुचाकीने (एमएच १५ बीएल ५६०६) येत होते.सैयद याचा ताबा सुटल्याने त्याची दुचाकी माळोदे यांच्या दुचाकीवर जाऊन आदळली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सैयद याचा मृत्यू झाला.तिसºया घटना नाशिक - पुणे महामार्गावर घडली. सायकलवरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१६) सकाळी चेहेडी परिसरात घडली. प्रवीण नामदेव बेलेकर (५३, रा. चेहेडी) असेमयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बेलेकर हे सायकलवरून जात असताना चेहेडीजवळ खाली पडल्याने गंभीर जखमी झाले होते.दुचाकी घसरून युवक ठारभरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना जुने नाशिकमधील मोठा राजवाडा परिसरात घडली. विकी संतोष तेजाळे (२४, रा. मोठा राजवाडा) असे आपघतात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. विकी हा दुचाकीने भरधाव जात असताना दुचाकी घसरून अपघात झाला. यावेळी तो रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला होता. त्यास उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातPolice Stationपोलीस ठाणे